आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशा सोडून देणे ही सर्वात मोठी चूक- दलाई लामा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१४ वे दलाई लामा : ६ जुलै १९३५ रोजी जन्मलेले. बालपणीचे नाव तेनजिन ग्यात्सो था. १७ नोव्हेंबर १९५० रोजी ते चौदावे दलाई लामा झाले. मानवीय मूल्ये आणि आधुनिक विज्ञानाचे ते समर्थक आहेत.

चुका दाखवणारे मित्रच चांगले असतात. कमजोरी दाखवून ते आपल्या व्यक्तिमत्त्वातील लपलेल्या खजिन्याबाबत सांगत असतात. त्यामुळे त्यांचा सन्मान केला पाहिजे.
समस्या उभ्या करणाऱ्या लोकांवर चिडू नका. कारण समस्यांचा सामना करण्यामुळेच आंतरिक शक्ती विकसित होते. सहिष्णुता आणि धैर्य दाखवण्याची संधीदेखील मिळते
करुणेचा संबंध धार्मिक विश्वासाशी नसून हे मानवीय आहे. आमची शांती आणि मानसिक स्थिरतेसाठी जरुरी आहे. करुणेशिवाय मनुष्याचे अस्तित्वच संभव नाही.
प्रसन्नता अनेकदा बाहेरून येत नसते. ही आपल्या कर्मानेच निर्माण होते.
समस्यांनाच आपली शक्ती बनवा. त्या कितीही गंभीर आणि कष्टदायी का असेना. उत्तमातील उत्तमाची आशा कायम ठेवा. जर आपण अाशा करणे सोडून दिले तर ही सर्वात मोठी चूक असेल.
नातेसंबंध गरजांवर आधारित नसतात. सर्वश्रेष्ठ नाते तेच असतात, ज्यात दोन्ही बाजूंनी प्रेम हे त्यांच्या गरजेपेक्षा अधिक महत्त्वाचे असते.
जीवनातील सर्वाधिक मोठे लक्ष्य दुसऱ्यांची मदत करणे हे आहे. जर आपण कोणाचीही मदत करू शकत नसेल तर त्याच्यासाठी किमान समस्या तरी उभ्या करू नका.
चिंता ही कुठल्याही समस्येचे समाधान नाहीच. जर एखाद्या समस्येचे निराकरण करायचे असेल तर त्यासाठी चिंता करू नका. जर त्यातून आपण मार्ग काढू शकत नसाल तर नुसतीच चिंता करणे व्यर्थ आहे.
जीवनात समाधान आणि आनंद मिळवायचे अनेक मार्ग आहेत. कुणी आपल्या उद्देशाच्या मार्गावरून चालत नसेल तर त्याचा हा अर्थ नव्हे की तो त्याच्या उद्दिष्टापासून
भरकटला आहे.
प्रत्येक कष्टाचे कारण अज्ञानता आहे. आनंद मिळवण्याच्या आपल्या लालसेपोटी आपण दुसऱ्यांना कष्ट पोहोचवतो.
आपण धर्म आणि अध्यात्माशिवाय जिवंत राहू शकतो, मात्र मानवी प्रेमाशिवाय नाही.
सर्वात कठीण समयीच आपण आपल्या व दुसऱ्यांसाठी सर्वोत्तम काही करू शकतो.
शांततेचा अर्थ हा नाही की, मतभेद होणारच नाही. मतभेद तर प्रत्येक ठिकाणी असतात. पण यास शांततापूर्ण पद्धतीने बोलण्यांद्वारा दूर करणे हीच शांतता होय.
मी आपल्या शत्रूंना नेहमी त्यांचा मित्र बनूनच पराभूत करतो.
जर आपण स्वत:शी प्रेम करू शकत नसाल तर आपण दुसऱ्यांशीही प्रेम करू शकणार नाही. आपल्याप्रतीच आपल्याला करुणा नसेल तर दुसऱ्यांसाठीदेखील आपण करुणेचा भाव दाखवू शकत नाही.