आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजपथावर तिरंग्याचा अवमान, पंतप्रधान मोदींविरोधात तक्रार दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योगादरम्यान मोदींनी गळ्यातील ओढणीने अनेकदा घाम पुसला. - Divya Marathi
योगादरम्यान मोदींनी गळ्यातील ओढणीने अनेकदा घाम पुसला.
पदुच्चेरी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मंगळवारी पद्दुचेरी पोलिस ठाण्यात एका सामाजिक कार्यकर्त्याने तक्रार दाखल केली आहे. मोदींवर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अंतरराष्‍ट्रीय योगा दिनाच्या दिवशी (21 जून रविवार) राजपथावर योगा करताना मोदींच्या गळ्यात तीन रंगाची एक ओढणी होती. पण मोदींनी गळ्यात तिरंगा गुंडाळला होता आणि त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान झाला असा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे.

तक्रार काय?
तक्रार दाखल करणाऱ्याने केलेल्या दाव्यानुसार मोदींनी गळ्यात तिरंगा गुंडाळलेला होता. त्याने मोदींनी अनेकवेळा चेहरा स्वच्छ केला. तसेच ते योगा करत होते, त्यावेळी अनेकदा तिरंगा जमिनीला लागला. अशा प्रकारे त्यांनी तिरंग्याचा अपमान केल्याचा दावा केला आहे.

पोलिसांचे वक्तव्य पोलिस म्हणाले की, दलित सेनाचे स्टेट जनरल सेक्रेटरी सुंदर यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. ते म्हणाले की, त्यांना व्हॉट्स अॅपवर असा फोटो मिळाला आहे, मोदी तिरंग्याचा अपमान करत असल्याचे दिसून येते. गळ्यात तिरंगा लटकावणे योगा करताने त्याला घाम पुसणे हा ध्वजाचा अवमानच आहे, असेही ते म्हणाले. तक्रारदाराच्या मागणीनुसार मोदींविरोधात प्रकरण दाखल करण्यात आले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, जागतिक योगा दिनी योग करताना मोदी...
बातम्या आणखी आहेत...