आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलित विकासावर मते मागणे, योग्य आहे का? : सुप्रीम कोर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- धर्म, भाषा जातीच्या आधारवर मते मागण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाने बुधवारी जात भाषेच्या आधारे मते मागण्यावर प्रश्न उपस्थित केले. सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांनी विचारले की, एखादा उमेदवार दलितांच्या विकासाचा मुद्दा पुढे करून मत मागू शकतो किंवा नाही? ही कृती चुकीची मानली जाईल काय?

काँग्रेस उमेदवाराची बाजू मांडणारे वकील कपिल सिब्बल त्यावर म्हणाले, अशी मते मागणे योग्य आहे. दलितांना घटनेनुसार संरक्षण आहे. परंतु दलित समाजाशी संबंधित असल्याच्या आधारावर मते मागणे कायद्याने गैर ठरते.

भाषेबाबत स्पष्ट कायदा नाही
विशिष्ट भाषिकांच्या विकासाचा मुद्दा घेऊन मते मागण्याला काय म्हणाल, अशी विचारणा सरन्यायाधीशांनी केली. महाराष्ट्रात हिंदी, मराठी भाषिक वादाचा संदर्भही त्यांनी दिला. त्यावर सिब्बल म्हणाले की, अशा मुद्द्यावर सुस्पष्ट कायदा नाही. यावर घटनापीठाला निर्णय घ्यायचा आहे.
बातम्या आणखी आहेत...