आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे तीन दिग्गज रामविलास पासवान यांच्या घरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ऐनकेन प्रकारे सत्तेत राहाण्याचा अनुभव असलेले लोकजनशक्ती पक्षाचे (लोजप) सुप्रीमो रामविलास पासवान आणि केंद्रातील सत्ता हस्तगत करण्यासाठी अतूर झालेली भाजप यांच्यात पडद्यामागे युती झाली आहे. पासवान यांच्याशी हातमिळवणीमागे देशातील दलित समाजाच्या 17 टक्के मतांवर भाजपचा डोळा आहे. पासवान यांच्या माध्यमातून देशातील किती दलित भाजपला समर्थन करतील हा वादाचा मुद्या असला तरी, त्यांचे होमग्राउंड असलेल्या बिहारमधील दलित-पददलितांची एकूण 14.2 टक्के मते ही भाजपच्या रडारवर आहेत. आता भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि रामविलास पासवान यांची दिल्लीत भेट होणे तेवढे बाकी आहे. या भेटीआधी भाजपचे तीन दिग्गज नेते - रविशंकर प्रसाद, शाहनवाज हुसैन आणि राजीवप्रताप रुडी यांनी पासवान यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. आज दिवसभरात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह देखील पासवान यांना भेटण्याची शक्यता आहे. या भेटीनंतर लोजप आणि भाजपच्या युतीची आणि जागा वाटपाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
दोन्ही पक्षांच्या सुत्रांनुसार, लोकजनशक्ती पक्षाला बिहारमध्ये वैशाली, हाजीपूर, जमुई, समस्तीपूर आणि खगडिया यासह लोकसभेच्या तीन जागा हव्या आहेत. आज जागावाटपाचे चित्र स्पष्ट झाले तर, युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

असे आहे समिकरण
- बिहारमध्ये पासवान समाजाची लोकसंख्या 4 टक्के आहे. भाजप आणि लोजप यांची युती झाली तर, पासवान आणि भाजपला त्यांच्या मतांचा लाभ मिळू शकतो.
- रामविलास पासवान यांना दलित नेते म्हणून ओळखले जाते. भाजपला आशा आहे, की बिहारमध्ये 10 टक्के असलेल्या पददलित समाजाची मते वळविण्यात ते यशस्वी झाले तर, दोन्ही पक्षांना त्याचा फायदा होईल.
सर्वच जाती धर्माच्या मतांवर डोळा
2009 च्या लोकसभा निवडणुकीत जनता दल संयुक्त (जेडीयू)सोबत युती केल्यामुळे भाजपला बिहारमधील सर्वच सवर्ण जातींनी मतदान केले होते. मात्र, यादव, मुस्लिम आणि पासवान समाज या युतीपासून लांब राहिला होता. एलजीपी आणि मागासवर्गींचे नेते उपेंद्र कुशवाहा यांचा पक्ष राष्ट्रीय लोक समात पार्टीसोबत युती केलीतर एनडीएला सवर्ण, वैश्य, पासवान आणि कोइरी समाजाजी मते मिळण्याची शक्यता आहे.