हैदराबाद/ दिल्ली - हैदराबाद विद्यापीठात पीएच. डी. करत असलेल्या रोहित वेमुला याच्या आत्महत्येनंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केल्याने वातावरण तणावपूर्ण आहे. या प्रकरणी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय आणि विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा राव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
मला लेखक व्हायचे होते...
‘जेव्हा तुम्ही हे पत्र वाचत असाल, त्या वेळी मी येथे नसेन... माझी कुणाबद्दलही तक्रार नाही. मला माझीच नेहमी अडचण होत होती. मला लेखक व्हायचे होते. विज्ञानाचा लेखक. आणि अखेरीस मला हे पत्र लिहावे लागत आहे. मी विज्ञान, ग्रह-तारे आणि निसर्गासोबतच माणसांवरही प्रेम करत होतो. माणसाने निसर्गाशी फारकत घेतली आहे हे माहीत असूनही. आपले प्रेम बनावटी झाले आहे. भावना न दुखावता प्रेम करणे आता कठीण झाले आहे. माणसाची किंमत त्याची ओळख झाली आहे. एक मत, एक गणती, एक चीज...’ (रोहितची सुसाइड नोट पाच पानी आहे. तिचा सारांश)
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, सुसाइड नोटचे फोटो..