आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा प्रवाह: केवळ छंद नव्हे, नृत्य आता उपचार पद्धती; अपंगत्वावरही करता येईल मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नृत्य किंवा नाटक हे क्षेत्र आता केवळ मनोरंजन राहिलेले नाही. या माध्यमातून मानसिक व शारीरिक आजारांवर उपचारही शक्य आहेत. यासाठी खास प्रशिक्षित व पदवीधारक थेरपिस्ट आहेत. आता ही उपचार पद्धती विशेष मुलांसाठीच्या शाळा, रुग्णालये आणि नृत्य प्रशिक्षण संस्थांचा अविभाज्य अंग बनली आहे. कंपन्यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांतील तणाव कमी करून कार्यक्षमता वाढवण्यासाठी कार्यालयात नृत्य उपचार पद्धती सुरू केली आहे.

विशेषत: नैराश्य आणि पार्किन्सनसारख्या आजारात शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी या माध्यमातून उपचार केले जात आहेत. नृत्य प्रशिक्षक निरमिथा जैन यांच्यानुसार, शरीरासाठी हालचाल अत्यंत महत्त्वाची असते. जन्मलेले अर्भकही हालचालींतूनच संकेत देते. आपण मोठे होत जातो तशी शरीराची हालचाल कमी होत जाते. यामुळे भावना व्यक्त होणे कमी होते. नृत्य या भावना व्यक्त करणारे सर्वात मोठे माध्यम आहे. मुंबईच्या देविका मेहता गरबाच्या वेळी आपल्या रुग्णांवर उपचार करतात. त्यांनी मानसशास्त्राचा अभ्यास केला आहे. त्यांची आई विशेष मुलांच्या शिक्षिका आहेत. त्यांच्या मते गरबातील हालचाली मानवी जन्मापासून मृत्यूपर्यंतचे जीवनचक्र दर्शवतात. टाळी वाजवल्याने अॅक्युप्रेशर केंद्रे उत्तेजित होतात, तर वाकणे व उठणे यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो.
 
दिव्यांग भावाला पाहून सुचली कल्पना
व्हीलचेअरवर असलेल्या आपल्या भावाला पाहून त्रिपुरा कश्यप यांना नृत्य उपचारांची कल्पना सुचली. त्यांच्या भाऊ गाणे ऐकताना कमरेच्या वरचा भाग तालावर हलवत असे. नंतरच्या काळात त्रिपुरा यांनी अमेरिकेत नृत्य उपचार पद्धतीचे प्रशिक्षण घेतले. आता त्या वृद्धाश्रमात या पद्धतीने उपचार करतात.
बातम्या आणखी आहेत...