आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकारी संकेतस्थळांवर ‘आधार’चा डाटा लीक; यूआयईडीएआयने केला खुलास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्र आणि राज्य सरकारांच्या विविध विभागांच्या सुमारे २१० संकेतस्थळांनी आधार कार्डधारकांची माहिती सार्वजनिक केली होती. त्यामुळे विविध योजनांच्या लाभार्थींचे नाव, पत्ता, आधार क्रमांक इत्यादी माहिती लीक झाली, असा खुलासा विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयईडीएआय) एका माहिती अधिकार अर्जाच्या उत्तरात केला आहे. 


डाटा लीक झाल्याची माहिती मिळताच संबंधित तपशील संकेतस्थळावरून हटवल्याचे यूआयईडीआयने सांगितले. मात्र, ही घटना नेमकी कधीची आहे, हे स्पष्ट केले नाही. दरम्यान, यूआयडीएआयमध्ये बहुस्तरीय सुरक्षा प्रणाली लागू असून डाटा सुरक्षेच्या दृष्टीने ती सतत अद्ययावत ठेवली जाते. डाटा प्रायव्हसी आणि सुरक्षेसाठी नियमितपणे सिक्युरिटी ऑडिटही केले जाते, असा दावा करत यूआयडीएआयने डाटा लिकच्या वृत्ताचे खंडण केले आहे.

बातम्या आणखी आहेत...