आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॅटसन रेडी-गो स्पोर्ट : सणांमधील नवा फ्लेव्हर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सणासुदीत कार खरेदी करणाऱ्यांना स्पोर्टी कार आकर्षित करत आहे. भारतातील महत्त्वाकांक्षी युवकांसाठी आकर्षक आणि स्वस्त गाड्यांची डिझाइन करण्यासाठी प्रसिद्ध जपानी ब्रँड डॅटसन इंडियाने एक पाऊल पुढे टाकत डॅटसन रेडी-गो स्पोर्ट सादर केली आहे. ही एक स्टायलिश गाडी आहे. रिओ ऑलिम्पिक पदक विजेता साक्षी मलिक या कारचा प्रचार करत आहे. लवकरच ही कार टीव्हीवरील जाहिरातीतही दिसेल. यामध्ये साक्षी आपल्या प्रशिक्षण आणि रनिंग सेशनसाठी रेडी-गो स्पोर्टमध्ये प्रवास करताना दिसेल. हे कॅम्पेन लवकरच टीव्हीवर प्रसारित होईल. नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॅटसन इंडियाच्या वरिष्ठ व्यवस्थापनाच्या वतीने साक्षीला पहिली डॅटसन रेडी-गो स्पोर्टची किल्ली देण्यात आली. साक्षीच्या यशाबद्दल तिला सन्मानित करण्याात आले.
रेडी-गो स्पोर्टमध्ये संपूर्ण ब्लॅक स्पोर्टी इंटेरिअर, म्युझिकसाठी ब्लूटूथ ऑडिओ फंक्शन, रिमोट की-लेस एंट्री आणि रिअर पार्किंग सेन्सर आहेत. या गाडीची किंमत फक्त ३,४९,४७९ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. ही कार मर्यादित कालावधीसाठी सणासुदीच्या दिवसातच उपलब्ध असेल. ही कार २५ किलोमीटर प्रति लिटरचे आकर्षक मायलेज देतात. तसेच पाच वर्षांच्या अतिरिक्त वॉरंटीचा पर्याय उपलब्ध आहे.
बातम्या आणखी आहेत...