फोटो : सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेताना जस्टीस एचएल दत्तू.
नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश एच.एल.दत्तू यांनी देशाचे 42 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित एका कार्यक्रमात त्यांना शपथ दिली. त्यापूर्वी शनिवारी माजी सरन्यायाधीश आर.एम.लोढा सेवानिवृत्त झाले होते.
दत्तू डिसेंबर 2008 मध्ये सुप्रीम कोर्टात न्यायाधीश बनले होते. दत्तू वकील नव्हे तर डॉक्टर किंवा इंजिनीअर बनू इच्छित होते. पण कुटुंबाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्याने त्यांना वकिली पेशामध्ये यावे लागले.
बहिणीच्या शिक्षणासाठी केला त्याग
चिकमंगलूर (कर्नाटक) च्या इडिगा समुदायात 3 डिसेंबर 1950 ला जन्मलेल्या दत्तू यांनी 1975 मध्ये बेंगळुरूत वकिली सुरू केली होती. डिसेंबर 1995 मध्ये हायकोर्टात ते न्यायाधीश बनले. तर फेब्रुवारी 2007 मध्ये छत्तीसगड हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश बनले. त्याच वर्षी मे महिन्यात त्यांना केरळ हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले. डिसेंबर 2008 मध्ये ते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश बनले. त्यांचे वडील शिक्षक होते. त्यामुळे घरात सुरुवातीपासूनच अभ्यासासाठी पोषक वातावरण होते. वडिलांना दत्तू यांच्याबरोबरच मुलीचे शिक्षणही करायचे होते. मुलीला डॉक्टर बनायचे होते. दत्तू यांचीही तशीच इच्छा होती. पण कुटुंबाची आर्थिक स्थिती तशी नव्हती. त्यामुळे दोघांवर तेवढा खर्च करणे प्रत्यक्षात त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे दत्तू यांनी एमबीबीएसऐवजी वकिली करण्याचा निर्णय घेतला.
गरीबांकडून फीस घेत नव्हते
एच.एल.दत्तू वकिली करणारे त्यांच्या कुटुंबातील पहिलेच व्यक्ती होती. कर्नाटकमध्ये हुशार आणि बिगरराजकीय वकील म्हणून त्यांना ओळखले जाते. बेंगळुरूमध्ये अनेकदा ते गरीब पक्षकारांकडून फीस घेत नव्हते असे, अनेक लोक सांगतात. दत्तू यांचे अत्यंत कमी मित्र आहेत. रिकाम्या वेळेत एकटे राहणेच त्यांना आवडते. ब-याचदा शुक्रवारी संध्याकाळी ज्या कारने ते सुप्रीम कोर्टातून घरी येतात, ती कार थेट सोमवारी सकाळी पुन्हा कोर्टात जाण्यासाठीच बाहेर निघते.