आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Daughter In Law Not Proprietary Rights, News In Marathi

सासरच्या संपत्तीत सुनेचा मालकी हक्क नाही, दिल्‍ली सत्र न्‍यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महिलेला सासऱ्याच्या मालकीच्या घरात राहण्याचा हक्क नसल्याचा निकाल दिल्लीतील एका सत्र न्यायालयाने दिला आहे. जी मालमत्ता फक्त सासरच्यांची आहे त्यात महिलेचा कुठलाही हक्क नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले.

न्यायदंडाधिकाऱ्यांचा निकाल रद्दबातल ठरवून अतिरिक्त सत्र न्यायाधीश पुलस्त्य प्रमाचल यांनी महिलेच्या सासू-सासऱ्यांना अपील दाखल करण्याची परवानगी दिली. जर ही मालमत्ता महिलेच्या पतीची असेल किंवा पतीचा त्यात वाटा असेल तरच ती घरात राहण्याच्या हक्काचा दावा करू शकते. या महिलेच्या पतीने यापूर्वीच भाड्याने घर घेतले आहे. तेथे राहण्याचा हक्क ती मागू शकते, असे कोर्टाने स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देताना न्यायाधीश म्हणाले की, जी मालमत्ता फक्त सासरच्या व्यक्तींची आहे तिच्यावर सुनेचा कुठलाही हक्क नाही आणि अशी मालमत्ता सामायिक निवास मानली जाऊ शकत नाही.प्रकरण घरगुती छळाशी संबंधित आहे. सासऱ्यांचे घर हे सामायिक निवास म्हणून गृहीत धरावे आणि महिलेला घरात पुन्हा प्रवेश द्यावा, असे निर्देश महिला न्यायालयाने दिले होते. त्याच्या विरोधात सासरच्या मंडळींनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती.

सासरच्या व्यक्तींनी हुंड्यासाठी छळ केल्याचा महिलेचा आरोप फेटाळून लावला. महिलेच्या पतीचा मालमत्तेवर कोणताच हक्क नाही. त्यामुळे ही मालमत्ता महिला सामायिक मालमत्ता नाही, असा सासरच्यांचा युक्तिवाद होता. न्यायालयाने हे प्रकरण न्यायदंडाधिकाऱ्यांकडे पुन्हा एकदा पाठवले आहे.