आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईसोबत राहण्यास नकार, 15 वर्षीय मुलीचा ताबा वडिलांकडे; सुप्रीम कोर्टाचा निकाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - घटस्फोटित दांपत्याच्या १५ वर्षीय मुलीने आईसोबत राहण्यास नकार दिल्याने सर्वोच्च न्यायालयाने तिचा ताबा वडिलांकडे दिला आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने वर्ष २०१०  मध्ये या मुलीचा ताबा आईला दिला होता, सर्वोच्च न्यायालयाने तो रद्दबातल ठरवला.
 
हा निकाल देताना न्यायमूर्ती ए. के. सिकरी आणि न्यायमूर्ती आर. के. अग्रवाल यांच्या न्यायपीठाने म्हटले आहे की, १५ वर्षांची ही मुलगी खूप समजूतदार आहे. आईसोबत राहायचे की वडिलांसोबत याचा निर्णय ती घेऊ शकते. १९९९ मध्ये विवाह झालेले हे दांपत्य मार्च २००० मध्ये ब्रिटनला स्थलांतरित झाले होते. जानेवारी २००२ मध्ये दिल्लीत त्यांच्या मुलीचा जन्म झाला. त्यानंतर पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. पत्नीने २००९ मध्ये ब्रिटनच्या एका न्यायालयामार्फत पतीपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर पती मुलीसह दिल्लीला परतला. दुसरीकडे, पत्नीने मुलीचा ताबा घेण्याचे प्रयत्न सुरू केले. 

२०१० मध्ये पंजाब आणि हरियाणातील उच्च न्यायालयाने पत्नीच्या  बाजूने निकाल दिला. त्याला पतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.न्यायपीठाने म्हटले आहे की, या प्रकरणी अनेकदा सुनावणी झाली. त्यावेळी आपल्याला वडिलांसोबतच राहायचे आहे, अशी इच्छा या मुलीने स्पष्टपणे व्यक्त केली होती. तिच्या इच्छेच्या विरुद्ध परदेशात पाठवण्याचा आदेश तिच्यासाठी वेदनादायक ठरेल. आईला पुरेसा वेळ देण्यात आला होता, पण ती मुलीचे प्रेम जिंकू शकली नाही.
बातम्या आणखी आहेत...