आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशरत जहाँ आत्मघातकी पथकाची सदस्य होती, हेडलीने केला खुलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लष्कर-ए-तोयबाचा अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली याने राष्ट्रीय तपास संस्थेच्या पथकाला (एनआयए) दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील इशरत जहाँ ही तरुणी दहशतवादी संघटनेच्या आत्मघातकी पथकाची सदस्या होती. इशरतला गुजरामध्ये अहमदाबाद पोलिसांनी चकमकीत मारले होते. परंतु ही चकमक बनावट असल्याच्या आरोपावरून वादात सापडली होती.

सूत्रांनी सांगितले की, हेडलीची चौकशी करण्यासाठी एनआयएची एक टीम शिकागोला गेली आहे. त्यांना चौकशीत ही माहिती मिळाली आहे. या पथकात एनआयए व कायदा विभागाचे सदस्यदेखील आहेत. पथकाला माहिती मिळाली की, इशरत लष्करच्या आत्मघातकी पथकाची सदस्य होती. तिला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी मुजामिलने भरती केले होते. त्याच वेळी हेडलीने २००६ पासून भारतात लष्करच्या दहशतवादी हल्ल्यासाठी रेकी करण्यास सुरुवात केली होती.

इशरत जहाँ, जावेद शेख ऊर्फ प्रणेश पिल्लई व दोन पाकिस्तानी नागरिक अमजद अली व झिशान जौहर अब्दुल गनीचा १५ जून २००४ रोजी मृत्यू झाला होता. हे लोक एका कारमधून आले होते व ते गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने गुजरातकडे जात होते. त्या वेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या दाव्यानुसार ते सगळे दहशतवादी होते. परंतु इशरतच्या कुटुंबीयांनी ती आत्मघातकी नव्हती, तर विद्यार्थी होती, असे म्हणत अपील दाखल केले होते. इशरतची आई शमीमा कौसरने गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी त्यांची मुलगी सेल्सवुमन म्हणून काम करत असल्याचा दावा केला होता.
पुढील स्‍लाइइडवर वाचा, काय आहे इशरत जहाँ प्रकरण?