नवी दिल्ली। आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणाची सुनावणी करणा-या दिल्ली पटियाला हाऊस न्यायालयाने अडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहीम आणि छोटा शकील या दोघांना फरार घोषित करण्याची तयारी केली आहे. न्यायालयातर्फे गुरुवारी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन दोघांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हजर होण्यासाठी या दोघांना 16 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना समन्सही जारी केले आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर, ठरलेल्या तारखेपर्यंत आरोपी न्यायालयात हजर झाले नाही तर, त्यांचा फरार घोषित केले जाणार आहे. तसेच त्यांची संपत्तीही जप्त केली जाणार आहे. आयपीएल फिक्सिंगचे जाळे दाऊद आणि शकील पर्यंत पोहोचले आहेत. त्यानंतर पटियाला हाउस न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दोघांच्या विरोधात चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी इतरही तिघे आरोपी आहेत. त्यांचा दाऊद आणि छोटा शकील यांच्याबरोबर संबंध असल्याची माहिती मिळाली होती. यात पाकिस्तानचा जावेद चुटानी, सलमान उर्फ मास्टर आणि एहतेशाम यांचा समावेश आहे. न्यायालयाने दाऊद आणि छोटा शकील यांच्याबरोबर या तिघांनाही अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहेत.
पुढे वाचा - काय आहे जाहिरातीचा मजकूर