आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय जवानाच्या निशाण्यावर होता Dawood, वाचा सात वेळा कसा बचावला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली. - 1993 च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी दाऊद इब्राहीमचा पाय कापला जाण्याची शक्यता आहे. शुगर आणि हाय ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्या दाऊदच्या या आजारांवर 10-12 दिवसांत नियंत्रण मिळवले नाही तकर त्याचा पाय कापावा लागणार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दाऊदला सुमारे तीन महिन्यांपूर्वी पायाला जखम झाली होती. आता त्या पायाला गँगरीन झाले आहे.

भारताचा मोस्ट वाँटेड असलेल्या दाऊदला पकडण्याची संधी भारताने अनेक वेळा गमावली आहे. भारताने दाऊदला पकडण्यासाठी अनेक मोहीमा आखल्या. पण अनेकदा ऐनवळी अचानक त्या रद्द करण्यात आल्या. त्यामागचे गूढही संशयाचे वातावरण तयार करणारे आहे. एका मोहिमेत तर भारतातील एजंट्सनी दाऊदला मारण्याची पूर्ण तयारी केली होती. कराचीत भारतीय एजंट्सच्या निशाण्यावर दाऊद होता. पण ऐनवेळी भारत सरकारने मोहीम थांबवली. अनेकदा दाऊद भारताच्या तावडीत आला होता. पण तो वारंवार सुरक्षा संस्थांच्या कचाट्यातून सुटण्यात यशस्वी ठरला आहे. अशाच काही घटना आपण आज जाणून घेणार आहोत.
सात वेळा भारताच्या तावडीतून निसटला आहे Dawood, कधी आणि कसा ते वाचा पुढील स्लाइड्सवर...