आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dawood Ibrahim Is Suffering From Life Threatening Gangrene In His Legs

दाऊदचा शेवट, कापावा लागणार पाय, मुलगी माहरुख असेल D कंपनीची वारस?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारताचा मोस्ट वाँटेड गुन्हेगार दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानमधील कराची या शहरात राहतो. पाकिस्तानमध्ये त्याचे अनेक बंगले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव तो कायम बंगले बदलत असतो. सध्या त्याला उच्च रक्तदाब व मधुमेहामुळे गँगरीन झाले आहे. त्याचा एक पाय कापला नाही तर संपूर्ण शरीरात विष पसरू शकते. मुंबईच्या अंडरवर्ल्डवर राज्य करणाऱ्या डॉनवर या रोगाच्या निमित्ताने बिकट परिस्थिती उद्भवली आहे.

पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दाऊदवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी म्हटले आहे की, गँगरीन खूप जास्त पसरले असून पूर्ण पाय कापल्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरलेला नाही. गँगरीनमुळे पायाचा मोठा भाग निर्जीव झाला असून विषामुळे इतर अवयवांवरही परिणाम होत आहे. त्यामुळे वेळीच ऑपरेशन करुन गॅंगरीनच्या प्रचारावर प्रतिबंध घालावा लागणार आहे.
उपचारांसाठी विदेशात नेणे शक्य नाही
दाऊद सध्या आयएसआयच्या देखरेखीखाली कराचीत राहतो. त्याला आयएसआयने सुरक्षा पुरवली आहे. एक कमांडो पथक कायम त्याच्या बंगल्याबाहेर तैनात असते. पण दाऊदचा संबंध अंडरवर्ल्डशी असल्याने त्याला उपचारांसाठी परदेशी नेणेही शक्य नाही. तसे केल्यास दाऊद पाकिस्तानमध्ये आहे किंवा होता हे सिद्ध होईल. त्याने पाकिस्तानचा बुरखा फाटेल. त्यामुळे त्याच्यावर कराचीतच खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
विदेशी डॉक्टर पाकिस्तानमध्ये येण्याची शक्यता
दाऊदला उपचारांसाठी विदेशात नेण्याची शक्यता कमी असल्याने प्रख्यात विदेशी डॉक्टर पाकिस्तानमध्ये आणले जाण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे कराचीच्याच एका खासगी रुग्णालयात विदेशी डॉक्टर बोलवून त्याच्यावर अद्ययावत उपचार केले जाऊ शकतात.
1993 च्या बॉम्बस्फोटांत 200 मृत्युमुखी, 700 जखमी
दाऊदच्या नेतृत्वातील डी कंपनीने अयोध्येचा बदला घेण्यासाठी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले होते. त्यात 200 मृत्युमुखी आणि 700 जखमी झाले होते. जखमींमध्ये अनेकांचे हात-पाय तुटल्याने त्यांना कायमचे अपंगत्व आले होते. आता आजाराच्या निमित्ताने का होईना. पण दाऊदवरही हिच वेळ आल्याचे दिसून येत आहे.

पुढील स्लाइडवर वाचा...
> दाऊदच्या वृत्तावर काय म्हणाला, त्याचा उजवा हात छोटा शकील...
> मोठी मुलगी माहरुख होऊ शकते त्याची उत्तराधिकारी...
>1993च्या बॉम्बस्फोटानंतर दाऊदने काढला देशाबाहेर पळ...
>दाऊदची संध्याची अवस्था काय आहे? तो कसा दिसतो?
>दाऊदचा मृत्यु झाल्यास भारताला बसेल मोठा झटका...?