आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशक्य ते शक्य, राजधानी दिल्लीमध्ये सम-विषम योजना लागू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वाढत चाललेले प्रदूषण कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून देशात पहिलावहिला नवा प्रयोग करत दिल्ली सरकारने महत्त्वाकांक्षी सम-विषम योजना शुक्रवारपासून लागू केली. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राजधानीच्या रस्त्यावर कारची संख्या खूपच कमी दिसली. या योजनेवर देखरेख करण्यासाठी दिल्लीत मोठ्या संख्येने पोलिस तैनात करण्यात आले होते. त्याचबरोबर सार्वजनिक वाहनांची संख्याही वाढवण्यात आली होती.

शुक्रवारी सकाळी आठच्या ठोक्यावर राजधानीत वाहनांची संख्या मर्यादित करणारी सम-विषम योजना लागू झाली. हजारोंच्या संख्येने स्वयंसेवक हातात गुलाबाची फुले घेऊन या योजनेच्या अंमलबजावणीसाठी वाहतूक पोलिसांना सहकार्य करताना दिसले. ही योजना १ जानेवारीपासून १५ जानेवारीपर्यंत लागू राहील. या योजनेला लोकांचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून उत्साहित झालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आप सरकारच्या प्रायाेगिक तत्त्वावरील या पुढाकाराने एका आंदोलनाचे स्वरूप धारण केल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी राजधानीच्या रस्त्यावर फक्त विषम नोंदणीच्या नंबरप्लेट असलेल्या खासगी कार धावल्या. सम क्रमांकाच्या कार रस्त्यावर दिसल्या तर २००० रुपये दंड लागणार होता. शनिवारी सम क्रमांकाच्या कार रस्त्यावर धावतील. विषम कार रस्त्यावर दिसल्या तर दोन हजार रुपये दंड आकारला जाईल. कामकाजाच्या दिवशी रात्री आठ वाजेपर्यंत ही योजना अमलात राहणार आहे.

सोमवारी योजनेची खरी परीक्षा
शुक्रवारी मोठ्या संख्येने खासगी कार्यालये बंद होती. शाळांनाही हिवाळी सुट्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक आधीच कमी होती. सोमवारी सर्व कार्यालये सुरू असतील आणि शाळांच्या सुट्याही संपणार आहेत. त्यामुळे सम- विषम योजनेची खरी परीक्षा सोमवारीच होणार आहे.

पुढे वाचा, भाजप खासदार सत्यपाल सिंह यांनीच केले नियमाचे उल्लंघन...
बातम्या आणखी आहेत...