आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दैनिक भास्कर’ मौल्यवान कंपन्यांच्या यादीत, 500 पैकी 219 व्या स्थानी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डीबी कॉर्प लिमिटेडचा भारताच्या सर्वात मौल्यवान कंपन्यांत समावेश करण्यात आला आहे. ‘बिझनेस टुडे’ या प्रख्यात व्यापारविषयक नियतकालिकाने देशात आर्थिकदृष्ट्या अत्यंत भक्कम असलेल्या अशा ५०० कंपन्यांची यादी तयार केली आहे. तीत डीबी कॉर्पला २१९ वे स्थान मिळाले आहे.
या कामगिरीबद्दल डीबी कॉर्पचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर अग्रवाल म्हणाले, ‘‘वाचकांना गुणवत्तापूर्ण मजकूर देण्याची आमची क्षमता यातून प्रतिबिंबित होते. आम्ही वाचकांना वस्तुनिष्ठ आणि निष्पक्ष बातम्या देण्यासाठी वचनबद्ध आहोत. त्यामुळे आम्हाला मजबूत ब्रँड विकसित करण्यात तसेच सर्वच बाजारांत अग्रस्थान मिळवण्यात मदत झाली आहे.
अलीकडेच आम्ही टाइम मॅगेझिन आणि हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू यांच्यासोबत जोडले जाण्यासाठी ‘नो निगेटिव्ह मंडे’सारखी पावले उचलली आहेत. त्यामुळे वाचकांसोबत योग्य ताळमेळ बसवण्यास मदत मिळाली आहे. रेडिओ आणि डिजिटल बिझनेस भक्कम करण्यासोबतच दैनिक भास्करला मीडिया इकोसिस्टीम बनवण्यास मदत मिळेल आणि आम्ही लोकांपर्यंत जास्त चांगल्या पद्धतीने पोहोचू शकू.”
अशी झाली निवड :
बीएसई आणि एनएसईमध्ये लिस्टेड ६,९४१ कंपन्यांच्या नावांवर विचार झाला. ज्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये १ एप्रिल ते ३० सप्टेंबरदरम्यान १२५ ट्रेडिंग दिवसांत २० टक्क्यांपेक्षा कमी दिवस ट्रेडिंग झाले, त्यांना बाद करण्यात आले. अशा प्रकारे रँकिंगसाठी ३,३७८ कंपन्याच उरल्या. सरासरी मार्केट कॅपच्या आधारावर टॉप १,००० कंपन्या निवडण्यात आल्या. पण फक्त मार्केट कॅपमुळे कोणत्याही कंपनीची संपूर्ण माहिती मिळत नाही. त्यामुळे एकूण संपत्ती, उत्पन्न, नफा, उत्पन्नाच्या तुलनेत नफ्याची टक्केवारी यांचाही विचार करण्यात आला. आकलनासाठी मार्च २०१५ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षाचे स्टँडअलोन आकडे घेण्यात आले. डीबी कॉर्प देशातील सर्वात मोठी प्रिंट मीडिया कंपनी आहे. ती दैनिक भास्कर, दिव्य भास्कर, दिव्य मराठी आणि सौराष्ट्र समाचार पत्र यांचे प्रकाशन करते. दैनिक भास्कर समूहाच्या १४ राज्यांत ६१ आवृत्त्या आहेत.