देशातील सर्वात मोठा माध्यम समूह दैनिक भास्कर आता
money.bhaskar.com या नवीन हिंदी बिझनेस पोर्टलच्या माध्यमातून व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांसाठी रोज ताज्या बातम्यांची पर्वणी घेऊन येणार आहे. बुधवारी नवी दिल्लीमध्ये केंद्रिय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही वेबसाईट लाँच केली. वेबसाइटवर कमोडिटी आणि शेअर मार्केटशी संबंधित सर्व ट्रेंडशी संबंधित टिप्स मिळतील. यामाध्यमातून व्यावसायिकांच्या फायद्याचा विचार केला जाईल. याचबरोबर ग्लोबल इकॉनॉमी ते लोकल इकॉनॉमीपर्यंत आर्थिक आणि बिझनेसविषयक बाबींवर विश्लेषण आणि तज्ज्ञांचा सल्ला मिळेल. ही वेबसाईट मोबाइलवरही उपलब्ध असेल.
व्यावसायिक व गुंतवणूकदारांच्या फायद्याचा हेतूmoney.bhaskar.com मध्ये आर्थिक धोरण, बाजारपेठ, अर्थव्यवस्था, बँकिंग, टॅक्स आणि गुंतवणूक या सर्वांबाबात विश्लेषण आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल. त्यामुळे व्यावसायिक आणि लघु उद्योजकांच्या नफ्यात वाढ होण्यास मदत मिळेल. संकेतस्थळामध्ये कमोडिटी, स्टॉक मार्केट, रुपया, बुलियन बाजाराचे रिअल टाइम लाइव्ह अपडेट आणि सल्ला मिळेल. हा सल्ला कमोडिटी आणि शेयर बाजारात गुंतवणूक करणा-यांसाठी अत्यंत फायद्याचा ठरत असतो.
money.bhaskar.com वर वाचकांना देशातील विविध राज्यांमध्ये गुंतवणुकीच्या संधी आणि सरकारी धोरणांचीही सर्व महत्त्वाची माहिती मिळेल. त्याचबरोबर मोठ्या बातम्यांचे वेगाने आणि मुद्देशीर अपडेट मिळेल.
money.bhaskar.com च्या लोकार्पणावेळी दैनिक भास्कर समुहाचे डेप्युटी एमडी पवन अग्रवाल, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. भरत अग्रवाल, दैनिक भास्कर डिजिटलचे सीओओ ग्यान गुप्ता,
money.bhaskar.com चे संपादक अंशुमान तिवारी यांची उपस्थिती होती.
फोटो कॅप्शन - दैनिक भास्करची हिंदी बिझनेस वेबसाइट money.bhaskar.com च्या लाँचिंग प्रसंगी केंद्रिय अर्थमंत्री अरुण जेटली, यांच्यासह दैनिक भास्कर समुहाचे डेप्युटी एमडी पवन अग्रवाल