आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशमध्ये भाजप सरकार स्थापन करणार; 57% लोकांनी DB Poll मध्ये सांगितले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशाच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या उत्तर प्रदेशसह ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी  होत आहे. पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता व त्यांनी विविध क्षेत्रांत घेतलेल्या निर्णयांच्या दृष्टीने हे निकाल महत्त्वाचे ठरणार आहेत.

उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंड या राज्यांत नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर  मतदानोत्तर चाचण्यांते उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-काँग्रेस आघाडी आणि भाजप यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे. तर, पंजाबमध्ये आप आणि काँग्रेस हे दोन मोठे पक्ष म्हणून समोर येत आहेत. उत्तर प्रदेशात भाजपने संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे. 
 
निकालांना विलंब
निवडणूक आयोगाने यासाठी कडक सूचना केल्या असून केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था आणि यात मोबाइलच्या वापरास बंदी याचे काटेकोर पालन व्हावे, असे आयोगाने म्हटले आहे. केंद्रांमध्ये केवळ सीआरपी जवानच तैनात असतील.
 
DainikBhaskar.com ने या राज्यातील निवडणुकीदरम्यान आपल्या वाचकांचा सर्वे केला. DB Poll मध्ये सहभागी झालेल्या 57% यूजर्सने यूपीमध्ये भाजप सरकार स्थापन करणार असल्याचे म्हटले आहे. 
 
 
 पहिला टप्पा 
 - यूपी निवडणुक सुरु झाल्यानंतर DainikBhaskar.com ने आपल्या वाचकांना प्रश्न विचारला होता - UP मध्ये झालेल्या मतदानानंतर कोणाचे सरकार स्थापन होणार ?
 - यावर 56,122 लोकांनी आपले मत नोंदवले. 
 
 कोणाचे सरकार बनणार 
भाजप    56%
सपा+काँग्रेस   23%
बसपा    13%
इतर    8%
 
दुसरा टप्पा 
- 10 मार्चला DB Poll मध्ये 37 हजार पेक्षा जास्त लोक सहभागी झाले. 
- त्यात विचारले गेले होते की UP मध्ये झालेल्या मतदानानंतर कोणाचे सरकार स्थापन होणार ?
 
कोणाचे सरकार बनणार 
भाजप  57%
सपा+काँग्रेस    27%
बसपा    11%
इतर    5%
 
उत्तर प्रदेश:विधानसभेच्या 403 जागा आणि लोकसभेच्या 80 जागा.
पक्ष 2012 विधानसभा मतदान % 2014 लोकसभा
समाजवादी पक्ष 224 29.2 5
बहुजन समाज पक्ष 80 25.9 0
भारतीय जनता पक्ष 47 15 73
काँग्रेस 28 11.6 2
इतर 24 18.3 0
 
 
2017 मधील 7 एक्झिट पोलमध्ये कोणाला झुकते माप ?  
पक्ष    2012 जागा सरासरी 
समाजावादी + काँग्रेस 224+28 122
भाजप + 47    216
बहुजन समाज पक्ष 80  56
                            
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...