आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत माफियाची महिलेला विवस्त्र करून लोखंडी रॉडने मारहाण, अवैध मद्यविक्रीची केली होती तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडित महिला. - Divya Marathi
पीडित महिला.
नवी दिल्ली - राजधानीत महिला आयोगाची स्वयंसेविका (33) हिच्या अब्रूचे भरदिवसा धिंडवडे काढल्याचे प्रकरण समोर आले आहे. नरेला परिसरात अवैध दारूविक्रीची तक्रार केल्यानंतर पोलिस-डीसीडब्ल्यूच्या कारवाईमुळे दारूमाफिया नाराज होते. बदला घेण्यासाठी त्यांनी गुरुवारी महिलेला भररस्त्यावर बेदम मारहाण केली. आरोपींनी तिचे कपडेही फाडले. आयोगाच्या अध्यक्षा स्वाती जयहिंद म्हणाल्या की, माफियांनी महिलेला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली आणि विवस्त्र करून गल्लीबोळातून फिरवले. पोलिस कुठपर्यंत दारू माफियांना साथ देणार आहेत?
- दुसरीकडे, शुक्रवारी पोलिसांनी 4 आरोपी महिलांनाही अटक केली आहे.
 
केजरीवाल महिलेची भेट घेणार
- डीसीपी रजनीश गुप्ता म्हणाले की, पीडित महिला आपल्या कुटुंबासह नरेला परिसरात राहते. महिला व्यसनमुक्तीसाठी काम करते. तिने परिसरातील घरांमध्ये अवैध मद्यविक्री करणाऱ्यांची तक्रार महिला आयोगात केली होती. यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पोलिस पथकासह छापेमारी करून मोठ्या प्रमाणात अवैध मद्यसाठा जप्त केला.
- सध्या, पीडित महिला दिल्लीच्या रुग्णालयात दाखल आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात जाणार आहेत.
 

डीसीडब्ल्यू टीमने 350 बॉटल दारू जप्त केली...
- डीसीडब्ल्यू चीफ यांच्या मते, अवैध दारूची तक्रार मिळाल्याने महिला आयोगाच्या पथकाने 6 डिसेंबरला नरेलाच्या जेजे क्लस्टरमध्ये छापा टाकला. येथे एका घरातून 350 बॉटल अवैध दारू जप्त करण्यात आली. यादरम्यान माफियाने पथकावर हल्लाही केला. एक महिलेला पकडून असभ्य वर्तन केले आणि पोलिस चूपचाप पाहत उभे होते.
- महिला आयोगाच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि- 323, 342, 354, 354B, 506, 509/34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 

पीडित महिला म्हणाली...
- एका व्हिडिओ पीडित महिला म्हणाली, मी गाडी सोडून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, माझा जीव तर वाचला, पण अब्रू वाचली नाही. त्यांनी माझे कपडे फाडले, सर्वांसमोर घोर अपमान केला. याच अवस्थेत तिथपर्यंत फरपटत नेले जेथे अवैध दारू पकडली होती. मला लोखंडी रॉडने खूप मारहाणही केली."


महिला आयोगाच्या अध्यक्ष काय म्हणाल्या?
- डीसीडब्ल्यू चीफ स्वाती जयहिंद म्हणाल्या, नरेलात एक गँग खुलेआम दारू विक्री करत आहे. येथून एका घरातून आम्ही दारू जप्त केली आहे. 50 मीटर अंतरावर पोलिस चौकी आहे. त्यांना कसे कळले नाही? पोलिसांची मिलीभगत असल्याने राजरोस हे प्रकार सुरू आहेत. ते हफ्ता घेऊन घरी बसतात.
- दिल्लीत महिला आयोगाच्या मेंबर्सही सुरक्षित नाहीत. माफियाने पीडितेचे कपडे फाडले, तिला न्यूड करून गल्लीबोळातून फिरवले. पोलिस आरोपींना केव्हा अटक करणार? आम्ही अशा लोकांना भिणार नाहीत. दारू माफियांविरुद्ध पुढेही काम करत राहू."

 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...