आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • DD News Anchor Fired For Calling China President 'Eleven Jinping'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनचे राष्ट्रपती Xi जिनपिंग यांना 'इलेवन जिनपिंग' म्हटल्याने दूरदर्शनची अँकर निलंबित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग
नवी दिल्ली - बुधवारी रात्री एका कार्यक्रमात चीनचे राष्ट्रपतची शी जिनपिंग यांच्या नावाचा इलेव्हन जिनपिंग असा उल्लेख करणा-या दूरदर्शनच्या अँकरला तडकाफडकी निलंबित करण्यात आले. जिनपिंग यांच्या नावातील Xi हे रोमन आकडे समजून या अँकरने 'इलेवन' म्हटले होते.
दूरदर्शनच्या अधिका-याने याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, ही एक अत्यंत गंभीर चूक आहे. कंत्राटी तत्वावर दाखल करून घेण्यात आलेल्या एका अँकरने ही चूक केली. पुढील काही महिने तिला बातमी पत्र वाचण्याच्या कामापासून दूर ठेवले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार वाहिनीने कर्मचा-यांच्या कमतरतेमुळे कंत्राटी पद्धतीवर भरती केलेल्या अँकरकडून काम करून घ्यावे लागते. विशेष म्हणझे दूरदर्शन इतर वाहिन्यांच्या स्पर्धेत टिकाव धरण्याचा प्रयत्न करत असताना ही बाब समोर आली आहे. दूरदर्शनच्या कार्यक्रमांच्या सुमार दर्जामुळे त्यांना फारशी लोकप्रियता मिळत नसल्याचे चित्र आहे.

सोशल साइट्वरही उडवली जातेय खिल्ली
दरम्यान या चुकीची सोशल साइट्वरही चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. टि्वटरवरील एक यूझर कनिका गेहलोतने दूरदर्शनच्या वृत्तनिवेदकांना किमान रोमन आकड्यांबाबत तरी ज्ञान आहे, असा टोला लगावला आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग शुक्रवारीच भारतातील दौरा आटोपून स्वदेशी परतले आहेत.

पुढे पाहा, जिनपिंग यांचे नाव घेताना यापूर्वी झालेल्या चुकांचा VIDEO