नवी दिल्ली- दिल्ली विकास प्राधिकरणाने (डीडीए) वन बीएचके, टू बीएचके आणि थ्री बीएचकेची जवळपास 25 हजार फ्लॅट्सची योजना जाहीर केले आहे. विशेष म्हणजे आजपासून (सोमवार) अर्ज विक्री सुरु झाली आहे. डीडीएच्या योजनेच्या फ्लॅट्सच्या किमती या बाजारमुल्यापैक्षा खूपच कमी असल्याने आम आदमीचे घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.
डीडीएच्या फ्लॅट अर्जाची किमत दोनशे रुपये असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 9 ऑक्टोबर आहे. फ्लॅटची सोडत (ड्रॉ) 29 ऑक्टोबरला काढली जाणार आहे. डीडीएने सुमारे 15 लाख अर्ज छापले आहेत. याचा अर्थ असा की, सगळ्या अर्जांची विक्री झाली तर 60 अर्जधारकांपैकी एका व्यक्तीला फ्लॅट मिळेल.
डीडीएने सादर केलेल्या योजनेतील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे फ्लॅट मालकांना पाच वर्षांनंतर मालकीहक्क मिळेल. यामुळे ड्रॉमध्ये मिळालेला फ्लॅट मालकांना पाच वर्षांपर्यंत विकता येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. मालकांना स्वत: फ्लॅटमध्ये राहावे लागेल अथवा त्यात भाडेकरू ठेवावा लागेल.
डीडीएने ठेवलेल्या या अटीमुळे आम आदमीला फायदा होणार आहे. घराचे स्वप्न पाहणार्या सामान्य नागरिकांसाठी जास्तीत जास्त फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आले आहे. डीडीएचा फ्लॅट खरेदी केल्यानंतर पाच वर्षे तो विकता येणार नसल्याने प्रॉपर्टी डीलर्स आणि ब्रोकर्सनी या योजनेपासून लांबच राहाणे पसंत केले आहे. फ्लॅट्स लवकरात लवकर विकून जास्त नफा कमवणे हा डीलर्स आणि ब्रोकर्सचा मूळ उद्देश असतो.
अर्जदारांना सुरुवातीला भरावे लागतील एक लाख रुपये...
डीडीएच्या योजनेत बुकींग करताना सामान्य श्रेणीतील अर्जदारांना सुरुवातीला एक लाख रुपये भरावे लागतील. 'ड्रॉ'मध्ये फ्लॅट न मिळाल्यास अर्जदारांनी भरलेले एक लाख रुपये परत मि मिळतील. उल्लेखनिय म्हणजे अर्ज भरताना चुकीची माहिती देणार्या अर्जदारांचे रुपये परत केले जाणार नसल्याचाही इशारा डीडीएने दिले आहे. तसेच EWS श्रेणीतील अर्जदारांना फक्त 10 हजार रुपये भरावे लागतील.
29 ऑक्टोबरमध्ये ड्रॉ आणि मार्चमध्ये पझेशन...
वन बीएचके, टू बीएचके आणि थ्री बीएचकेच्या फ्लॅटसाठी अर्ज करण्यासाठी 9 ऑक्टोबर ही अंतिम तारीख आहे. तसेच 29 ऑक्टोबरला ड्रॉ काढला जाईल. वसंत कुंज, द्वारका आणि रोहिणी भागात हे फ्लॅट्स आहेत. फ्लॅट्स मार्च 2015 मध्ये वितरीत केले जातील.
15 लाखांपैक्षा जास्त अर्ज....
2008 मध्ये डीडीएने 5,238 फ्लॅट्सची योजना सादर केली होती. यासाठी 5.67 लाखांहून अधिक लोकांना अर्ज केला होता. नंतर 2010 मध्ये 16,118 फ्लॅट्सची योजना लॉन्च करण्यात आली होती. 7.5 लाख लोकांनी अर्ज केला होता. यंदा 25हजार फ्लॅट्सची योजना वसून डीडीएने 15 लाख अर्ज उपलब्ध करून दिले आहेत.
बाजारमुल्यापेक्षा खूपच स्वस्त...
डीडीएच्या फ्लॅट्सला दिल्लीकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याचे कारण म्हणजे, डीडीएचे फ्लॅट्स बाजारमुल्यापेक्षा खूपच स्वस्त आहे. डीडीएने यंदा सादर केलेल्या योजनेतील टू बीएचके फ्लॅटची किमत 41 लाख ते 70 लाख रुपयेदरम्यान आहे. (जागेनुसार फ्लॅटची किमत कमी जास्त होईल) ब्रोकर्सने दिलेल्या माहितीनुसार, सध्या दिल्लीत टू बीएचके फ्लॅट्सचे बाजारमुल्य 70 लाख रुपयांपासून 1.2 कोटी रुपये दरम्यान आहे.
डीडीएच्या योजनेविषयी थोडक्यात माहिती...
- 18 वर्षे वयाचा कोणताही भारतीय व्यक्ती डीडीएच्या फ्लॅटसाठी अर्ज करू शकतो. विशेष अर्जदाराच्या नावे दिल्लीसह परिसरात एकही फ्लॅट अथवा घर नसावे. एक व्यक्त फक्त एका फ्लॅटसाठी अर्ज करू शकतो.
- आवेदन शुल्क एक लाख रुपये आहे. ड्रॉमध्ये ज्या अर्जदारांना फ्लॅट मिळणार नाही. त्यांनी भरलेले एक लाख रुपये 90 दिवसांत परत केले जातील.
- डीडीएच्या योजनेतील जवळपास 90 टक्के (22,600) फ्लॅट्स वन बीएचके असून ते वसंत कुंज, द्वारका आणि रोहिणी भागात आहेत. उर्वरित 1700 फ्लॅट्समध्ये 2 बीएचके आणि थ्री बीएचके आहेत.
- वन बीएचके फ्लॅटची किमत 14 लाख रुपये, 2 बीएचकेची किमत 41 लाख ते 70 लाख रुपये तर 3 बीएचकेच्या फ्लॅटची किमत 1.2 कोटी रुपये आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, असा काढला जातो ड्रॉ...
(फाइल फोटो: डीडीएचे फ्लॅट्स)