आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवाल यांच्यासह सहा जणांना जामीन, यामुळे जेटलींनी केली होती केस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डीडीसीएतील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर जेटली यांनी हा खटला दाखल केला होता. - Divya Marathi
डीडीसीएतील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर जेटली यांनी हा खटला दाखल केला होता.
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या अब्रुनुकसान प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीच्या ५ नेत्यांना गुरुवारी जामीन मिळाला. पटियाला हाऊस न्यायालयाने त्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. डीडीसीएतील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर जेटली यांनी हा खटला दाखल केला होता. यात केजरींसह आशुतोष, संजय सिंह, कुमार विश्वास, राघव चंदा आणि दीपक बाजपेयी यांच्या नावांचा समावेश आहे.