आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dearness Allowance For Central Govt Employees Hiked To 80%

केंद्रीय कर्मचा- यांचा डीए आठ टक्क्यांनी वाढला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्रीय कर्मचा- यांच्या महागाई भत्त्यात (डीए) कॅबिनेटने 8 टक्क्यांच्या वाढीस गुरुवारी मंजुरी दिली. महागाई भत्ता 72 टक्क्यांवरून 80 टक्के झाला आहे. केंद्र सरकारचे 50 लाख कर्मचारी आणि 30 लाख निवृत्ती वेतनधारकांना याचा लाभ होणार आहे. विशेष म्हणजे डीएमधील ही वाढ 1 जानेवारी 2013पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे.

पीएफ उचल, ट्रान्सफर 1 जुलैपासून ऑनलाइन
देशभरातील सुमारे 5कोटी पीएफ खातेदार आता रकमेची उचल किंवा ट्रान्सफर करण्यासाठीचा अर्ज आॅनलाइन करू शकतील. 1 जुलैपासून ही सुविधा लागू होत आहे. यामुळे पीएफसंबंधी प्रकरणे लवकर निकाली निघू शकतील.