आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिहार जेलमध्‍ये कैद्याला ठेचून मारले; हाय सिक्युरिटी वॉर्डमध्‍ये घडली घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली - येथील तिहार कारागृहातील हाय सिक्युरिटी वॉर्डमध्‍ये एका कैद्याला त्‍याच्‍या सोबत‍ असलेल्‍या इतर चार कैद्यांनी रॉड आणि ग्रीलने ठेचून मारल्‍याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला. मृत कैद्याचे नाव दीपक असे सांगितले जात आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ज्‍या चार कैद्यांवर दीपकच्‍या हत्‍येचा आरोप आहे ते अनेक दिवसांपासून दीपक सोबत राहत होते. दरम्‍यान, असे असताना दीपक याने एकदाही त्‍याची तक्रार केली नाही किंवा ते त्रास देतात हेही सांगितले नाही. त्‍यामुळे नेमक्‍या कोणत्‍या कारणाने हा खून झाला, याचा तपास आम्‍ही करत आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
यापूर्वीसुद्धा झाला होता खून
यापूर्वी 11 मे 2015 रोजी अशीच घटना या कारागृहात घडली. यात तीन कैद्यांनी अजयकुमार नावाच्‍या कैद्याचा खून केला होता. अजय हा वॉर्ड क्रमांक 15 कडे जात होता. त्‍यावेळी तिघांनी त्‍याला अडवून मारहाण केली. यात त्‍याचा मृत्‍यू झाला.