आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्युदंडाची शिक्षा माफ केल्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मुलांवर पाशवी अत्याचाराची चार आणि हत्येच्या प्रकरणातील एका दोषीची मृत्युदंडाची शिक्षा माफ केल्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी या दोषींची मृत्युदंडाची शिक्षा जन्मठेपेत बदलली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व गृह मंत्रालयाला नोटीस पाठवली.
पत्रकार पिंकी विरानी यांची जनहित याचिका सरन्यायाधीश पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने याचिका दाखल करून घेतली आहे. प्रतिभाताईंनी मृत्युदंडाच्या 35 शिक्षा जन्मठेपेत बदलल्या होत्या. यातील पाच प्रकरणे मुलांवरील अत्याचाराची होती. या दोषींना फाशीच व्हायला हवी, असे याचिकेत म्हटले आहे.
सेंट्रल जेलचा गार्ड मोलई व कैदी संतोषने सहायक जेलरच्या 16 वर्षीय मुलीवर अत्याचार करून मृतदेह सेप्टिक टँकमध्ये फेकला होता. 199 मध्ये त्याला फाशीची शिक्षा झाली. दुसर्‍या घटनेत सतीश नामक दोषीने शाळेत जाणार्‍या सहा वर्षीय मुलीवर बलात्कार केला होता. तर बंटूच्या अत्याचाराने पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. सुशील मुर्मू या दोषीने 9 वषींय मुलाचा बळी दिला होता.