आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी लष्करप्रमुख व्ही. के . सिंग यांच्या वक्तव्यावरून गदारोळ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नॅशनल कॉन्फरन्सची जम्मू-काश्मिरातील सत्ता उलथवण्याचा कट केल्याचा आरोप असलेले माजी लष्करप्रमुख व्ही.के. सिंह यांच्या वक्तव्यावरून गदारोळ माजला आहे. राज्यात राजकीय स्थैर्य टिकावे म्हणून लष्करामार्फत मंत्र्यांना पैसे दिले जात होते, असा दावा सिंह यांनी केला होता. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही आरोपांची गंभीर दखल घेतली आहे. सिंह यांनी पैसे घेणा-या संबंधित मंत्र्यांची नावे जाहीर करावीत, असे आवाहन करून केंद्र या प्रकरणाची चौकशी करेल, असे शिंदे म्हणाले.


केंद्रीय मंत्री फारुख अब्दुल्ला यांनी या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. लष्कराने कोणा मंत्र्याला किती पैसे दिले. त्याचा वापर कशासाठी झाला हे समोर आले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. निवृत्तीपासून वादग्रस्त ठरलेले जनरल सिंह यांनी लष्करात स्थापन केलेल्या विशेष गुप्तचर विभागाच्या कारवायांची चौकशी करण्याची मागणी संरक्षण मंत्रालयाने केली आहे. या माध्यमातून सिंह यांनी जम्मू-काश्मीर सरकार पाडण्याचा डाव आखला होता, असाही त्यांच्यावर आरोप आहे. भारतीय लष्कराच्या वतीने यासंबंधीचा एक अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला असून सिंह यांनी गुप्तचर गुप्तचर विभागासाठी देण्यात आलेल्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप या अहवालात आहे.


प्रकरण काय?
सिंह यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लष्कराकडून जम्मू-काश्मीर सरकारमधील काही मंत्र्यांना पैसे पुरवले जात असल्याचा आरोप केला होता. एवढेच नव्हे, तर स्वातंत्र्योत्तर काळाच्या सुरुवातीपासून हा प्रकार सुरू आहे. राज्यात राजकीय स्थिरतेसाठी हा पैसा दिला जातो, असे त्यांचे म्हणणे आहे.