आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेबिट कार्डनेही जीएसटी जमा करण्याची सुविधा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जीएसटीच्या नव्या व्यवस्थेत व्यावसायिक डेबिट तसेच क्रेडिट कार्डच्या माध्यमातूनही कर जमा करू शकणार आहेत. मंगळवारपासून नवीन पोर्टल www.gst.gov.in सुरू करण्यात आले आहे. अद्याप यामध्ये सध्या असलेल्या करदात्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. असा समावेश करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जीएसटीसाठी 
आवश्यक असलेल्या सॉफ्टवेअरचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्याच्या परीक्षणाचे कामही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती जीएसटी नेटवर्कचे अध्यक्ष नवीन कुमार यांनी ही माहिती दिली.  

सध्या देशात व्हॅट भरणारे ६० लाख, सेवा कर भरणारे २० लाख तसेच अबकारी कर भरणारे तीन ते चार लाख करदाते आहेत. त्यांचा समावेश या नव्या पोर्टलवर करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. येथून प्रत्येक करदात्यांच्या नावाने नवीन प्रोव्हिजनल ओळख क्रमांक जीएसटीआयएन देण्यात येणार आहे. नवीन नोंदणी एप्रिल २०१७ पासून सुरू होणार आहे.  

सध्या व्यावसायिकांना अबकारी, सेवा कर तसेच व्हॅटसाठी वेगवेगळे रिटर्न भरावे लागतात. नवीन व्यवस्थेत ५० लाख रुपयांपेक्षा कमी टर्नओव्हर तसेच कंपोझिशन योजना असणाऱ्यांना प्रत्येक तिमाहीमध्ये तसेच इतरांना दर महिन्याला रिटर्न भरावा लागणार आहे. ते डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातूनही रिटर्न भरू शकतील.  ऑनलाइन नोंदणी, परतावा, रिटर्न फायलिंग तसेच कर जमा करणे हे सर्व जीएसटी नेटवर्कवरून करता येईल.  जीएसटी नेटवर्कचे काम नोव्हेंबर २०१५ मध्ये सुरू झाले होते. त्या अंतर्गत दिल्ली आणि बंगळुरूमध्ये चार डाटा सेंटर बनवण्यात येत आहेत. हार्डवेअर आयात करण्यात येत असल्याचेही कुमार यांनी सांगितले आहे. डिसेंबरपर्यंत सर्व उपकरणांचे परीक्षण सुरू करण्यात येणार आहे.

अशी करावी लागेल नोंदणी  
वस्तु आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी नेटवर्कवर असेसींचा समावेश झाल्यानंतर त्यांचा ओळख क्रमांक (जीएसटीआयएन) केंद्र तसेच राज्य सरकारांना देण्यात येत आहेत. ते त्या-त्या करदात्यांना तो क्रमांक देतील. नोंदणीसाठी त्या करदात्याला पोर्टलवर या क्रमांक तसेच पासवर्डच्या माध्यमातून लॉग इन करावे लागेल. त्यानंतर त्यांना अापल्या कंपनीविषयीची बेसिक माहिती भरावी लागणार आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत व्यावसायिक माहिती जमा करू शकतील. नाेंदणीमुळे व्यावसायिकांना रिटर्न फाइल करणे आणि रिफंड क्लेम करण्यासाठी मदत मिळेल. कर परताव्यासंबंधित दावा (इनपूट टॅक्स क्रेडिट) देखील करदात्यांना येथेच करावा लागेल.
बातम्या आणखी आहेत...