आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dec 16 Case: SC Allows JJB To Deliver Verdict Involving Minor

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्‍ली गँगरेपः अल्‍पयवयीन आरोपीची शिक्षा सुनावण्‍यास सुप्रिम कोर्टाची परवानगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशाची राजधानी नवी दिल्लीत गेल्या वर्षी 16 डिसेंबरला झालेल्‍या सामुहिक बलात्‍कार प्रकरणातील अल्‍पवयीन आरोपीवर सुरु असलेल्‍या खटल्‍याचा निर्णय देण्‍यास सर्वोच्‍च न्‍यायालयाने आज बालन्‍यायिक मंडळाला परवानगी दिली आहे. या प्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देषांच्‍या अभावी बालन्‍यायिक मंडळाले 31 ऑगस्‍टपर्यंत निकाल लांबणीवर टाकला होता. दरम्‍यान, 'अल्‍पवयीन' आरोपींची व्‍याख्‍या नव्‍याने स्‍पष्‍ट करण्‍यासंदर्भात सर्वोच्‍च न्‍यायालयाने याचिका दाखल करुन घेतली आहे.

नवी दिल्‍लीत 16 डिसेंबर 2012 ला या तरुणीवर धावत्‍या बसमध्‍ये सामुहिक बलात्‍कार करण्‍यात आला होता. याप्रकरणी अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपींपैकी एकाला अल्‍प्‍वयीन ठरविण्‍यात आले होते. बालन्‍यायिक मंडळाकडून त्‍याच्‍याबाबत सुनावणी पूर्ण झाली आहे. बलात्‍कार पीडित तरुणी आणि तिच्‍या मित्राला बसमध्‍ये बसविण्‍यापूर्वी या आरोपीने इतर साथीदारांच्‍या मदतीने एका सुतारकाम करणा-याला मारहाण करुन लुटल्‍याप्रकरणी दोषी ठरविले आहे. मात्र, सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशांच्‍या अभावामुळे निर्णय दिला नव्‍हता. सरन्यायाधीश पी. सदाशिवम यांच्या खंडपीठाने ज्युवेनाईल न्यायालयास निर्णय सुनाविण्याची परवानगी दिली. आता सर्वोच्‍च न्‍यायालयाने परवानगी दिल्‍यामुळे 31 ऑगस्‍टला या आरोपीचा निर्णय लागण्‍याची अपेक्षा आहे.

या बलात्‍काराच्‍या घटनेने देशभरात खळबळ उडाली होती. अतिशय निर्दयीपणे पीडितेवर अत्‍याचार झाले होते. तिच्‍या मृत्‍यूस कारणीभूत ठरणा-या गंभीर स्‍वरुपाच्‍या अंतर्गत जखम याच अल्‍पवयीन आरोपीने दिल्‍याचा आरोप आहे. तसेच त्‍याने तिच्‍यावर दोन वेळा बलात्‍कार केल्‍याचाही आरोप आहे. आरोपींना कठोर शिक्षा देण्‍याच्‍या मागणीसाठी दिल्‍लीत तरुणाईने तीव्र निदर्शने केली होती. पीडित तरुणीचा 29 डिसेंबर रोजी सिंगापूर येथील एका रुग्णालयात मृत्यू झाला होता.

बलात्‍कार प्रकरणी मुख्य आरोपी राम सिंह, विनय शर्मा, अक्षय ठाकूर, पवन गुप्ता, मुकेश आणि एका अल्पवयीन मुलास पोलिसांनी अटक केली होती. परंतु, राम सिंह याने 11 मार्च रोजी तिहार तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

खासदार सुब्रमण्‍यम स्‍वामी यांनी 'अल्‍पवयीन' या शब्‍दाची नव्‍याने व्‍याख्‍या करावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली. ती सरन्‍यायाधीशांच्‍या खंडपीठाने दाखल करुन घेतली. आरोपीला अल्‍पवयीन ठरविण्‍यासाठी केवळ 18 वर्षे वयाचीच अट नसावी तर, त्‍याची शारिरीक आणि मानसिक अवस्‍था जाणून अल्‍पवयीन ठरविण्‍यात यावे, अशी मागणी स्‍वामी यांनी केली आहे.