आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डिसेंबर तिमाहीत विकास नकारात्मक राहील : अँबिट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नोटबंदीनंतर विविध संस्थांनी जीडीपी विकास दर घटणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अर्थव्यवस्था सुस्त पडल्याचे ‘अँबिट कॅपिटल’ने एका अहवालात म्हटले आहे.
चालू वित्त वर्षात पहिल्या सहामाहीत विकास दर ६.४ टक्के होता, तर दुसऱ्या सहामाहीत यात घट होऊन फक्त ०.५ टक्के राहण्याची चिन्हे आहेत. ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत विकास दर नकारात्मक राहण्याचा अंदाज आहे. ब्रोकरेज फर्मनुसार, २०१७-१८ मध्ये जीडीपी विकास दर ५.८ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहील, असे दिसते. पुढील वर्षी विकास दर ७.३ टक्के राहण्याचा अंदाज या फर्मने व्यक्त केला होता. केअर रेटिंग्जने या वर्षी विकास दर ०.३ -०.५ टक्के कमी राहणार असल्याचे सांगितले होते. नोटबंदीच्या पूर्वी यात ७.८ टक्के विकासाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. यापूर्वी एचएसबीसीचे अर्थशास्त्रज्ञ प्रांजूल भंडारी यांनीही विकास दर ०.७-१.० टक्क्यांपर्यंत कमी राहील, असे सांगितले होते.
अँबिटनुसार, जीडीपीमध्ये ४० टक्के भागीदारी असलेले अनौपचारिक क्षेत्रातील अर्धे व्यवसाय नफ्यात राहणार नाहीत. याचे मार्केट संघटित क्षेत्राकडे जाईल. भविष्यात रिअल इस्टेट क्षेत्राला याचा मोठा फटका बसणार आहे. परंतु दोन वर्षांत या क्षेत्रात मोठ्या कंपन्यांचा मार्केट शेअर वाढेल, असेही फर्मला वाटते. अँबिट कॅपिटलने म्हटले आहे की, सामान्य स्थितीत मार्च २०१७ मध्ये सेन्सेक्स २९,५०० पर्यंत पोहोचण्याचा अंदाज होता. परंतु आता २०१८ पर्यंत इंडेक्स २९ हजारांवर जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नोटाबंदीचा निर्णयानंतर जवळपास सर्वच क्षेत्रावर त्याचा परिणाम होत आहे. सर्वसामान्यांचे जीवनही या निर्णयामुळे विस्कळीत झाल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. विकास दर घटल्यामुळे विकासाला खीळ बसेल असे तज्ज्ञांना वाटते.
सेवा क्षेत्राचे होणार जास्त नुकसान
केअरच्या मते, सेवा क्षेत्राला सर्वाधिक नुकसान होणार आहे. याची भरपाई होणेही अवघड जाणार आहे. परंतु बँकांना फायदा होणार आहे. या निर्णयाचा शेतीवर अधिक परिणाम होणार नाही. शिवाय एसएमईची उत्पादने शेड्यूल अॅडजस्ट करण्यात बऱ्याच अडचणी येणार आहेत. यंदाच्या वित्त वर्षात रेपो रेट ०.२५ - ०.५० टक्क्यापर्यंत घटवण्यात येईल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. मागील महिन्यात आरबीआयने रेट ०.२५ टक्के घटवून ६.२५ टक्के केला होता.
बातम्या आणखी आहेत...