आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानच्या पंतप्रधानांच्या दौऱ्यात मिळणार पहली बुलेट ट्रेन, कराराची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - जपानची बुलेट ट्रेन. जपानमध्ये या ट्रेनला ‘शिंकान्शेन’ म्हटले जाते. - Divya Marathi
फाइल फोटो - जपानची बुलेट ट्रेन. जपानमध्ये या ट्रेनला ‘शिंकान्शेन’ म्हटले जाते.
नवी दिल्ली - जपानचे पंतप्रधान शिंजो आबे पुढील आठवड्यामध्ये भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या व्हिजिटीदरम्यान भारत आणि जपान या दोन्ही देशांमध्ये बुलेट ट्रेनबाबत एत महत्त्वाचा करार होण्याची शक्यता आहे. आबे भारताला पहिल्या बुलेट ट्रेनची भेट देऊ शकतात.

या आठवड्यात भारतात येणार आबे यांचे सल्लागार
- एका इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार जपानच्या पंतप्रधानांचे विशेष सल्लागार हिरोतो इजोमी या आठवड्यात भारतात येत आहेत. त्यांच्या व्हिजिटदरम्यान दोन्ही देशांमध्ये हायस्पीड रेल्वेच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. जपानमध्ये बुलेट ट्रेनला ‘शिंकान्शेन’ म्हटले जाते.
- हिरोतो पीएमओ आणि रेल्वे मिनिस्ट्रीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करतील. या चर्चेमध्ये बुलेट ट्रेन अॅग्रिमेंटबाबत अखेरच्या करारावर सह्या होण्याची शक्यता आहे.
- पहिली बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद दरम्यान असू शकते.
- दोन्ही स्टेशनदरम्यानचे अंतर कापण्यासाठी सध्या सात तास लागतात.
- बुलेट ट्रेन सुरू झाल्यास हे अंतर दोन तासांमध्ये कापले जाऊ शकेल.
भारताला जपानची स्पेशल ऑफर
- जपान भारताला 50 वर्षांसाठी 90 हजार कोटींचे कर्ज देईल.
- त्याचा व्याजदर केवळ 0.5 टक्के असेल.
- इतर देशांकडून जपान अशा कर्जासाठी 1.5 टक्के व्याजदर आणि तोही केवळ 25 वर्षांसाठी आकारत असतो.

पीएमओच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, व्याजदर आणि कर्ज परतफेडीच्या कालावधीची जी ऑफर दिली आहे ती आपल्यासाठी फायद्याची ठरू शकते. त्यासाठी पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशांदरम्यान संबंध सुधाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले आहेत.

आतापर्यंत झालेली चर्चा
जपानच्या ‘जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी’ म्हणजेच जेआयसीएने मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन चालवण्याच्या योजनेचा अभ्यास केला आहे. पहिल्या बुलेट ट्रेनसाठी हा रूट अत्यंत योग्य असल्याचेही या संस्थेने सांगितले. दोन्ही स्टेशनदरम्यानचे अंतर 505 किमी आहे. त्यावर ताशी 200 किमी वेगाने बुलेट ट्रेन चालेल. या प्रोजेक्टवर 98,805 कोटींचा खर्च होईल. हा प्रोजेक्ट 2024 पर्यंत पूर्ण होईल अशी शक्यता आहे.

11 तारखेला आबेंचे आगमन
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचे 11 डिसेंबरला भारतामध्ये आगमन होणार आहे. 12 तारखेला बुलेट ट्रेनसंबंधी करारावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. आबे या दौऱ्यात वाराणसीलाही भेट देणार आहेत.

शिंकान्शेन आणि आपली बुलेट ट्रेन
- जपानची शिंकान्शेन ही ताशी 320 किमी वेगाने धावते.
- भारतात बुलेट ट्रेन 300 किमी वेगाने धावेल.
- एक प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी 6 ते 7 वर्षे लागतील.
- मोदींच्या सप्टेंबर महिन्यात जपान दौऱ्यामध्ये या प्रोजेक्टबाबत निर्णय झाला होता.