आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Decision On 1993 Mumbai Blasts Convict Yakub Memon\'s Final Mercy Plea Likely Today

MUMBAI BLASTS: याकूबला फाशीच, सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटीशन फेटाळले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 1993च्या मुंबईतील साखळी स्फोटातील दोषी याकुब अब्दुल मेमनच्या फाशीच्या शिक्षेवर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले आहे. याकूबने दाखल केलेले क्युरेटिव्ह पिटीशन आज (मंगळवार) नामंजूर करण्यात आले आहे. जर क्युरेटिव्ह पिटीशन मंजूर झाले असते तर त्याच्या शिक्षेवर पुन्हा एकदा सुनावणी सुरु झाली असती. मात्र सुप्रीम कोर्टाच्या तीन सदस्यीय पीठाने ही याचिक फेटाळली आहे. त्यामुळे येत्या 30 जुलैला त्याला नागपुर कारागृहात फासावर लटकवले जाणे जवळपास नक्की समजले जात आहे.

काय आहे क्यूरेटिव्ह पिटीशन ?
सुप्रीम कोर्टाकडून न्याय झाला नाही असे जेव्हा वाटते तेव्हा याचिकाकर्ता क्यूरेटिव्ह पिटीशन दाखल करु शकतो. न्यायासाठीची ही अतिशय महत्त्वाची आणि शेवटची संधी असते. सुप्रीम कोर्टाने आपल्याच निर्णयावरील पुनर्विचार याचिका फेटाळली असेल तव्हा याचिकाकर्ता क्यूरेटिव्ह पिटीशन दाखल करु शकतो. या याचिकेवर सुप्रीम कोर्टाच्या तीन न्यायाधिशांच्या पीठासमोर सुनावणी होते. न्यायाधिशांच्या चेंबरमध्येच ही सुनावणी केली जाते. तिथे एकही वकील असत नाही. मात्र पुनर्विचार याचिका रद्द करण्यात आलेल्या खंडपीठाचे न्यायाधिश या सुनावणीस उपस्थित असतात. तेही त्यांना वेळ असेल तर. अर्थात येथे फक्त न्यायाधिश असतात.

पुनर्विचार याचिका आणि दयेचा अर्जही झाला आहे रद्द
याआधी 9 एप्रिल रोजी सुप्रीम कोर्टाने याकूब मेमनची पुनर्विचार याचिका रद्द केली होती आणि फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. मेमनने फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्याची मागणी केली होती. याकूबच्या वकिलांनी युक्तीवाद केला होता, की त्याने स्वतः स्फोट घडवून आणलेले नाहीत. तो फक्त या षडयंत्रात सहभागी होता, त्याने स्फोट घडवून आणले नाही. याकूबची दया याचिका गेल्या वर्षी राष्ट्रपतींनी फेटाळली होती. त्याआधी 21 मार्च 2013 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या विशेष कोर्टाने फाशीची शिक्षा कायम ठेवण्याचा निर्णय दिला होता.
चुलत भावाने घेतली याकूबची भेट
सर्वोच्च न्यायालयाने याकूबच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले असून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्याचा दया अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर याकूबने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली असून त्या याचिकेवर आज (मंगळवार) सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. याकूबला 30 जुलै रोजी फाशी दिली जाऊ शकते. नागपूर मध्यवर्ती कारागृहात तशी तयारी सुरू असल्याची माहिती आहे. पुण्यावरुन जल्लादही बोलावण्यात आल्याची माहिती आहे.
सोमवारी याकूबची पत्नी व मुलगी भेटण्यासाठी नागपुरात येणार असल्याची माहिती होती. परंतु, याकूबची पत्नी आणि मुलीऐवजी त्याचा चुलतभाऊ उस्मान मेमन हा सकाळी 11 वाजता नागपूर कारागृहात दाखल झाला. सामान्य कैद्यांसाठी असणाऱ्या मुलाखत कक्षाऐवजी त्यांची कारागृहाच्या दुसऱ्या कक्षात भेट ठेवण्यात आली. या वेळी त्यांनी जवळपास 30 मिनिटे चर्चा केली.
दरम्यान, याकूब मेमन हा साखळी बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार व फरार आरोपी टायगर मेमन याचा भाऊ आहे. याकूबने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमनसोबत मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा कट रचला होता. 27 जुले 2007 मध्ये टाडा कोर्टाने त्याला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. याकूब मागील 20 वर्षांपासून तुरुंगातच आहे.

1993मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 निष्पाप लोकांचा मृत्यु झाला होता. तसेच 700 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटादरम्यान बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला 6 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संजय दत्त पुण्यातील येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत आहे.