आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BJP अध्यक्षपदी राहाणार शहा, गुजरात MLA\'s निवडणार आनंदीबेन यांच्या जागी नवा CM

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ अहमदाबाद - बुधवारी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेल्या भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत गुजरात मुख्यमंत्र्यांची निवड होऊ शकली नाही. व्यंकय्या नायडूंनी भाजपाध्यक्ष अमित शहा मुख्यमंत्री होणार या वावड्या असल्याचे सांगत शहांच्या नावाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. गुरुवारी गुजरात विधानसभेत भाजप आमदार आपला नेता निवडणार आहेत.

आमदारांमधूनच निवडला जाणार मुख्यमंत्री
- व्यंकय्या नायडू म्हणाले, 'शहा भाजपाध्यक्षपद सोडून गुजरातचे मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणासाठी त्यांची गरज आहे.'
- 'गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्याची निवड आमदारांच्या बैठकीत होईल. नव्या मुख्यमंत्र्यांची निवड आमदारांमधूनच केली जाईल.'

विजय रुपाणी स्पर्धेत सर्वात पुढे
- गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष विजय रुपाणी हे मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत सर्वात पुढे आहेत.
- रुपाणी हे राजकोटमधील जैन कुटुंबातील आहेत. त्यांनी यापूर्वी पक्ष आणि सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.
- रुपाणी पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. राज्यातील भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना ते ओळखतात. राज्यात प्रत्येक ठिकाणी काय समस्या आहे याचीही त्यांना माहिती आहे.
- तज्ञांचे मत आहे की शहा अशा व्यक्तीच्या शोधात आहे ज्याची संघटनेवरही पकड आहे आणि राज्य कारभारही सांभाळू शकेल. त्यासोबतच त्यांच्या मर्जीतील व्यक्तीलाच संधी मिळू शकते.
नितीन पटेल प्रबळ दावेदार
- राज्याचे सर्वात ज्येष्ठ नेते नितीन पटेल देखील मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत आहेत.
- ते पटेल कम्युनिटीचे आहे. त्यांच्या निवडीचा पक्षाला निवडणुकीत मोठा फायदा होऊ शकतो. पटेलांनी नुकतेच आरक्षणासाठी रान पेटवले होते.
- गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी 1 ऑगस्ट रोजी फेसबुक पोस्ट द्वारे राजीनामा देण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून गुजरातचा सीएम कोण असणार याची चर्चा सुरु आहे.
पुढील स्लाइडमध्ये, आनंदीबेन यांच्या राजीनाम्याचे कारण...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)