आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Decision On Leader Of Oppn Before Budget, Says Sumitra Mahajan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विरोधी पक्षनेतेपद; यूपीए लोकसभाध्यक्ष भेट आज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा कायम असतानाच यूपीएच्या घटकपक्षांचे खासदार गुरुवारी प्रथमच लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना भेटणार आहेत. विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा ते सादर करणार असल्याच समजते. गेल्या आठवड्यात या मुद्दय़ावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाजन यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी म्हटले आहे. विरोधातील सर्वात मोठा पक्ष काँग्रेसकडे केवळ 44 खासदार आहेत.

पदासाठी आवश्यक 10 टक्के संख्याबळ नसल्याने काँग्रेसने आजवर अधिकृतपणे दावा केला नव्हता. परंतु पक्षाचे लोकसभेतील मुख्य प्रतोद ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मंगळवारी यूपीएच्या वतीने लोकसभा अध्यक्षांची वेळ घेतली. काँग्रेससह राष्ट्रवादी, राजद, मुस्लिम लीगचे खासदार एकत्रितपणे दुपारी 12 वाजता महाजन यांना भेटतील. यूपीए घटकपक्षांचे मिळून 60 खासदार आहेत.

लोकसभेच्या सोमवारपासून सुरू होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी या मुद्दय़ावर महाजन यांना निर्णय घ्यायचा आहे. त्यातच सुभाष कश्यप, मोहन पारासरन अशा विधी व घटनातज्ज्ञांनी या पदावरून विभिन्न मते मांडली आहेत. आघाडतील एखाद्या पक्षाकडे हे पद द्यावे असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे गुरुवारची ही भेट महत्त्वाची ठरली आहे. तथापि, लोकसभाध्यक्ष गुरुवारी क्वचितच या मुद्दय़ावर निर्णय घेतील, असे सचिवालयातील सूत्रांचे म्हणणे आहे.