आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Decision To Award Sachin Tendular Bharat Ratna Instead Of Dhyan Chand Was Taken In 5 Hours

राहुल गांधींनी सांगितले अन् पाच तासांत झाला सचिनला भारतरत्न देण्याचा निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : सचिनचा सामना पाहताना राहुल गांधी

नवी दिल्ली - गेल्या वर्षी सचिन तेंडुलकरला भारतरत्न प्रदान करण्यासाठीची कागदोपत्री कारवाई अवघ्या पाच तासांत पूर्ण करण्यात आली होती. विशेष म्हणजे सचिनच्या नावासाठी कोणी शिफारसही केलेली नव्हती. 'DNA' या इंग्रजी वृत्तपत्राने केलेल्या दाव्यानुसार राहुल गांधी यांच्या सांगण्यावरूनच एवढ्या घाईत सचिनला भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली असण्याची शक्यता आहे.

या वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की, 14 नोव्हेंबरला राहुल गांधींना असे लक्षात आले की, सचिनबाबत देशभरात एक उत्साहाची लाट आणि सकारात्मक परिस्थिती आहे. तो दिवस त्यांच्या शेवटच्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस होता. त्यामुळे राहुल गांधींनी निवडणुकीचा दौरा रद्द करून मुंबईला जाऊन सामना पाहण्याचा निर्णय घेतला. याचवेळी त्यांनी सचिनला भारतरत्न देण्यासंदर्भात चर्चा केली असण्याची शक्यता आहे.

14 नोव्हेंबरला दुपारी 1.35 वाजता पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) मध्ये एख पत्र तयार झाले. त्यात क्रीडा मंत्रालयाकडून तत्काळ सचिन तेंडुलकरचा बायोदाटा मागवण्यात आला. ‘Urgent: Out Today’ अशी नोंद करून पत्र पाठवण्यात आले. काही तासांतच पीएमओला बायोडाटा मिळाली. त्यानंतर सायंकाळी उशीरा पंतप्रधानांकडे सचिनला 'भारतरत्‍न' प्रदान करण्यासंबंधी अंतिम नोट पोहोचली. दुस-या दिवशी (15 नोव्हंबर) दोघांना (सचिन आणि शास्त्रज्ञ सीएनआर राव) 'भारतरत्‍न' देण्याचा प्रस्ताव सहीसाठी राष्‍ट्रपतींकडे पाठवण्यात आला. राष्ट्रपतींची सहीही त्याच दिवशी झाली.
पुढील स्लाईडवर पाहा... मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न देण्यासाठी शिफारस करण्यात आलेले पत्र...