आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Decisions Of Supreme Court Which Brought Relief To Citizen Of India

सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या या निर्णयांमुळे घडली क्रांती, जनतेला मिळाला दिलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्‍च न्‍यायालयाने शुक्रवारी ऐतिहासिक निर्णय देऊन मतदारांना 'राईट टू रिजेक्‍ट' देण्‍याचा आदेश दिला. सर्वोच्‍च न्‍यायालयाने काही महिन्‍यांपूर्वीच गुन्‍हेगार लोक‍प्रतिनिधींना निवडणूक लढविण्‍यापासून रोखणारा आदेश दिला होता. सरकारने हा निर्णय एका अध्‍यादेशाद्वारे फिरवला. हा अध्‍यादेश सध्‍या राष्‍ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठविण्‍यात आला आहे. काल राहुल गांधी यांनीही या अध्‍यादेशाबद्दल तीव्र नाराजी व्‍यक्त केली होती. याशिवाय स्‍पॉट‍ फिक्सिंग आणि सट्टेबाजीच्‍या आरोपात अडकलेले बीसीसीआयचे अध्‍यक्ष एन. श्रीनिवासन यांना पदग्रहण करण्‍यापासूनही न्‍यायालयाने रोखले आहे. जावयावर गंभीर आरोप लागल्‍यानंतर श्रीनिवासन पदावर कसे आहेत, याबद्दल न्‍यायालयाने आश्‍चर्य व्‍यक्त केले.

सर्वोच्‍च न्‍यायालयाने यापूर्वीही असे अनेक कठोर निर्णय दिले आहेत. हे निर्णय खरे तर सरकारनेच घ्‍यायला हवे. असे निर्णय देऊन सर्वोच्‍च न्‍यायालया सरकारला आरसा दाखविण्‍याचेच काम करते. या निर्णयांमुळे सर्वसामान्‍य जनतेला अनेकदा दिलासा मिळाला आहे. आधार कार्डची सक्ती रोखणे, सर्रास ऍसिड विक्री रोखणे इत्‍यादी महत्त्वाचे निर्णय सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिले आहेत.

अशाच काही निर्णयांची माहिती वाचा पुढील स्‍लाईड्समध्‍ये....