आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Declare Afzal Guru Date Warrant, Union Information Commission Said To Tihar

अफजलचे डेथ वॉरंट सार्वजनिक करा, केंद्रीय माहिती आयोगाचा तिरुंग अधिका-यांना आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - फाशी देण्यात आलेला अतिरेकी अफजल गुरूचे डेथ वॉरंट सार्वजनिक करण्याचे आदेश केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) तिहार तुरुंग अधिका-यांना दिले आहे. सोबतच फाशीच्या सूचना त्याच्या कुटुंबीयांना देण्यासंदर्भातील पत्राची प्रतही आहे. संसदेवरील हल्ला प्रकरणात गुरूला ९ फेब्रुवारी २०१३ मध्ये फाशी देण्यात आली होती.

माहिती आयुक्त एम.श्रीधर आचार्युलु यांनी हा निकाल दिला. त्यात म्हटले आहे की, माहितीचा अिधकार कायद्यान्वये विचार न करता कोणताही अर्ज फेटाळला जाऊ शकत नाही. याबाबत पारसनाथ सिंह यांनी आरटीआय अर्ज केलेला आहे. त्यात दस्तऐवजांसोबतच गुरुच्या फाशीच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगचीही मागणी करण्यात आली आहे. तिहार तुरुंगाने राष्ट्रीय सुरक्षेच्या जोखमीच्या आधारे अर्ज फेटाळला होता. दिली जाऊ शकणारी व न देता येणारी माहिती, असे दोन भाग केले जाऊ शकतात.

फाशीची रेकॉर्डिंग देण्यास रोखले
आयुक्तांनी तिहार तुरुंगाच्या अधिका-यांना गुरूच्या फाशीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग न देण्यास सांगितले आहे. फाशीची तारीख निश्चित करणा-या अधिका-याला जीवाचा धोका होऊ शकतो, यामुळे त्याचे नावही सार्वजनिक न करण्यास सांगितले आहे.