आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Declared Modi As Prime Minister Candidate, Otherwise Forget Support Ramdevbaba

मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करा, अन्यथा पाठिंबा विसरा- रामदेवबाब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - योगगुरू रामदेवबाबा पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. त्यांनी शुक्रवारी थेट भाजपलाच इशारा दिला. नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करा; अन्यथा पाठिंबा विसरा, असे त्यांनी बजावले. शिवाय, मोदींवर त्यांनी स्तुतिसुमने उधळली.


मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करण्यावरून भाजपमध्येच सुंदोपसुंदी सुरू आहे. पंतप्रधानपदासाठी त्यांचे नाव जाहीर न करता भाजपने त्यांच्यावर प्रचार समितीची जबाबदारी सोपवली. मात्र, रामदेवबाबा मोदींपेक्षा घाईत आहेत. देशाला महानायकाची गरज असल्याचे सांगून त्यांनी मोदींची पाठराखण केली.


...तर आसारामबापूंना शिक्षा व्हावी : आसारामबापूंवर असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपाबाबत बोलताना रामदेवबाबा म्हणाले, बापू दोषी असतील तर त्यांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी.


काँग्रेसवर हल्लाबोल
इंग्रजांसारखी काँग्रेसने लूट केली. कच्चा माल बाहेर जातो. पक्का माल चौपट दराने पुन्हा देशात येतो. 13 सप्टेंबरपासून परिवर्तन यात्रेत पर्दाफाश करेन असे सांगून 8 सप्टेंबरला दिल्लीत जाहीर सभा घेणार असल्याचेही रामदेव म्हणाले.