आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्च महिन्यात व्यापारात घट; निर्यातीत झाली वाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील व्यापारात मार्च महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली असून निर्यातीत मात्र अपेक्षेपेक्षा वाढ झाली आहे. त्यामुळे आधीपासून तोट्यात असलेल्या व्यापार क्षेत्रात तुटीची भर पडली आहे. फेब्रुवारीत व्यापारातील तूट ८९० कोटी डॉलरची होती. ती मार्चमध्ये १०४४ कोटी डॉलर्सवर पोहोचली आहे. दरम्यान, निर्यातीत मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. 

फेब्रुवारी महिन्यात देशभरात २४४९ कोटी डॉलरची निर्यात झाली, तर मार्चमध्ये त्यात वाढ होऊन २९२३ कोटी डॉलरवर पोहोचले. निर्यातीमुळेच व्यापारात तूट आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दुसरीकडे कच्चे तेल आणि सोन्याच्या आयातीत मागील काही काळापासून सातत्याने वाढ होत आहे. मार्चमध्ये ७६८ कोटी डॉलरच्या तेलाची आयात ९७१ कोटी डॉलरवर पोहोचली. सोन्याच्या आयातीतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मार्च महिन्यात सोन्याची आयात ३४८ कोटी डॉलरवरून ४१८ कोटी डॉलरवर पोहोचली आहे. चांदीची आयात १४.८ कोटी डॉलरवरून २०.४२ कोटी डॉलरवर पोहोचली आहे.

पेट्रोलियम उत्पादने आणि आभूषणांची निर्यात वाढली...
देशातील वाहनांची वाढती संख्या आणि सोन्यासह अन्य दागिन्यांना असलेल्या मागणीचा परिणाम निर्यातीवर दिसून येत आहे. मार्चमध्ये पेट्रोलियम उत्पादनाची निर्यात २४७ कोटी डॉलरवरून ३७० कोटी डॉलरवर पोहोचली, तर आभूषणांमध्ये १० कोटी डॉलरची वाढ नोंदवण्यात आली आहे. मार्चमध्ये सुमारे ४११ कोटी डॉलरची अाभूषणे निर्यात करण्यात आली. देशांतर्गत उत्पादन वाढल्यामुळे यंदा डाळीची आयात अपेक्षेने कमी करण्यात आली. मार्चमध्ये यात पूर्वीपेक्षा सुमारे ११ कोटी डॉलरची घट झाली आहे. 
बातम्या आणखी आहेत...