आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे अाेझे कमी करा, अादित्य ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख अादित्य ठाकरे यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन दप्तरांचे अाेझे करण्यासाठी देशभरातील शालेय विद्यार्थ्यांना टॅब द्या अशी मागणी केली अाहे.महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात युतीची सत्ता अाल्यास प्रत्येक विद्यार्थ्यांच्या दप्तराचे अाेझे कमी करू; प्रत्येकाला टॅब देऊ असे आश्वासन शिवसेनेने दिले हाेते. स्वत: उद्धव ठाकरे हे प्रत्येक प्रचार सभांमध्ये ‘टॅब’ घेऊन त्याचे सादरीकरण देत हाेते. या अडीचशे ग्रॅम टॅबमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम टाकण्यात अाल्याचेही सांगत हाेते. मात्र स्वबळावर सत्तेत येऊ न शकल्याने विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे अाेझे कमी करण्याचे उद्धव यांचे अाश्वासन अपूर्ण राहिले. घाेषणा केली ती पाळली पाहिजे म्हणून मुंबईत काही ठिकाणी त्यांनी टॅबचे वाटप केले. परंतु संपूर्ण महाराष्ट्रासाठी एवढा खर्च कसा करायचा हा प्रश्न त्यांच्यापुढे अाहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अाणि त्यांचे सहकारी विनाेद तावडे यांना सातत्याने चिमटे काढत होते. शेवटचा पर्याय शिवसेनेला पंतप्रधानांकडे शरण यावे लागले अाहे.

अादित्य ठाकरे यांनी पंतप्रधान माेदी यांना अभ्यासक्रम टाकण्यात अालेला ‘टॅब’ दाखविला व हा टॅब देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला दिल्यास १० किलाेचे अाेझे अडीचशे ग्रॅमवर येऊ शकते असे सांगितले. पंतप्रधानांनी ठाकरेंचे म्हणणे एेकूण घेत ताे ‘टॅब’ स्वत:कडे ठेऊन घेतला. तसेच मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. पंतप्रधान अापल्या मागणीला मूर्त रुप देतील कारण डिजिटल इंडियाचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र माेदींचे अाहे अाणि तेच अाम्ही राबवित असल्याची प्रतिक्रिया अादित्य ठाकरे यांनी दिली.

अशीही घराणेशाही
युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दिल्ली दौ-यामुळे शनिवार असतानाही शिवसेनेचे खासदार दिल्लीत थांबले हाेते. रविवारी संसदेचे कामकाज बंद असूनही खासदार दिल्लीबाहेर गेले नाहीत. ठाकरे येणार असल्याने त्यांना थांबण्याचे अादेश देण्यात अाले हाेते. अादित्यसोबत अनिल देसाई, चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत, अानंदराव अडसूळ, गजानन कीर्तिकर, राजन विचारे, रवींद्र गायकवाड, राहुल शेवाळे हे खासदार हाेते.

अामच्याकडे लाेकशाही अाहे अाणि काँग्रेसमध्ये घराणेशाही अाहे अशी टीका करणा-या शिवसेना खासदारांना शिवसेनेतील घराणेशाहीपुढे सामाेरे जावे लागत अाहे. उद्धव ठाकरेंचा वाढदिवस २७ जुलैला असताे. या वेळी संसदेचे अधिवेशन सुरू असते. मात्र त्याला बुट्टी मारत सर्व खासदार मुंबईत माताेश्रीवर हजर राहतात. याही वेळेस तसेच झाले. याला अपवाद हाेते केवळ केंद्रीय अवजड उद्याेग मंत्री अनंत गिते. ते मुंबईला पाेहाेचले नसल्याने अन्य खासदारांनी कुरबुरी केल्यात, परंतु मला लाेकसभेत राेस्टरप्रमाणे ड्युटी हाेती असे कारण पुढे करीत स्वत:ची सुटका करून घेतली. अाज शनिवार असतानाही शिवसेनेचे खासदार दिल्लीत थांबले हाेते. अादित्य ठाकरे दिल्लीत येणार असल्याने त्यांना थांबण्याचे अादेश देण्यात अाले हाेते. अादित्य यांच्यासाेबत अनिल देसाई, चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत, अानंदराव अडसूळ, गजानन कीर्तिकर, राजन विचारे, रवींद्र गायकवाड, राहुल शेवाळे हे खासदार हाेते.
छायाचित्र: शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख अादित्य ठाकरे यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन दप्तरांचे अाेझे करण्यासाठी देशभरातील शालेय विद्यार्थ्यांना टॅब द्या अशी मागणी केली अाहे.