आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानहानी दावा प्रकरण : अर्थमंत्री अरुण जेटलींचे पुरावे अमान्य : आप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व इतर पाच जणांविरुद्ध मानहानीप्रकरणी अर्थमंत्री अरुण जेटलींच्या इलेक्ट्रॉनिक पुराव्यांना विरोध केला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी या प्रकरणी सुनावणी केली होती. आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी आपला विरोध दर्शवला.

आपच्या नेत्यांनी जेटलींकडून दाखल केलेल्या पुराव्यांच्या प्रिंटआऊट स्वीकार्ह नसल्याचे म्हटले आहे. रजिस्ट्रार के. वेणुगोपाल यांच्यासमोर हे पुरावे सादर केले आहेत. जेटलींनी प्रमाणपत्र सादर केले नाहीत. शिवाय याच्या समर्थनार्थ शपथपत्रही दाखल केलेले नसल्याचे आप नेत्यांचे म्हणणे आहे. भारतीय साक्ष अधिनियमाच्या कलम-६५ बी (इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची स्वीकारार्हता) अंतर्गत हे अनिवार्य आहे. त्यामुळे या पुराव्यांचा स्वीकार शक्य नाही. जेटलींच्या वकील प्रतिभा एम. सिंह यांनी केजरीवाल, राघव चड्ढा, कुमार विश्वास, आशुतोष, संजय सिंह, दीपक वाजपेयींच्या युक्तिवादांचा विरोध केला. त्यांनी म्हटले, ‘ जेटलींनी शपथपत्र दाखल केले आहे. त्यामुळे न्यायालयाने पुढील कारवाई करावी.’ त्यावर आप नेत्यांनी शपथपत्र अपूर्ण असल्याचे म्हटले आहे. पुढील सुनावणी २९ मार्च रोजी होईल.
बातम्या आणखी आहेत...