आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Defence Minister Manhohar Parrikar Reacts On Myanmar Operations

भारताच्या बदललेल्या दृष्टीकोनामुळे घाबरून येताहेत प्रतिक्रिया-पर्रिकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताच्या लष्काराने म्यानमारमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात केलेल्या कारवाईतून दहशतवाद्यांना बंदोबस्त करण्याबाबत भारताचा बदललेला दृष्टीकोन दिसत असल्याचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर गुरुवारी म्हणाले. पर्रिकर म्हणाले की, बदल घडण्यासाठी दृष्टीकोन बदलण्याची गरज असते. दहशतवाद्यांच्या विरोधात घेतलेल्या एका साधारण अॅक्शमुले देशात सुरक्षेच्या संदर्भात दृष्टीकोन बदलला आहे. तसेच जे भारताच्या या बदललेल्या दृष्टीकोनामुले घाबरले आहेत त्यांनी याबाबत प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानने आम्ही म्यानमार नसून आमच्याकडे अण्वस्त्र असल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्या वक्तव्याशी पर्रिकर यांचे हे वक्तव्य जोडून पाहिले जात आहे.

पर्रिकर यांनी म्यानमारमध्ये करण्यात आलेल्या ऑपरेशनची माहिती देण्यास मात्र नकार दिला. तसेच हे ऑपरेशन म्यानमारमध्ये नव्हे तर भारतीय सीमेतच झाले होते, असे म्यानमारने सांगितले होते, त्याबाबतही पर्रिकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. दरम्यान, म्यानमार ऑपरेशनबाबत गृह मंत्रालयाची एक उच्चस्तरीय बैठक बुधवारी झाली. त्यात लष्कराबरोबरच गुप्तचर संस्था रॉ, आयबीचे अधिकारी हेही सहभागी झाले होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल काही दिवसांत म्यानमारला जाण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी ते तेथील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने दहशतवाद्यांच्या विरोधात कायमस्वरुपी धोऱणावर चर्चा करतील.