आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Defence Minister Manohar Parrikar Speak On Terrorist

नौकेतील माणसे संशयित अतिरेकीच : मनोहर पर्रीकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अरबी समुद्रातील नौकेवरील कारवाईवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी परिस्थितिजन्य पुराव्यावरून ही माणसे अतिरेकीच असणे शक्य असल्याचे म्हटले आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री अरबी सुमुद्रातील कारवाईदरम्यान स्फोटाने उडवून दिलेली नौका तस्करांची असल्याचे वृत्त पर्रीकर यांनी फेटाळून लावले आहे. नौकेला आग लावणे आणि आत्मघात करण्याचे कृत्य तस्करांचे असू शकत नाही. त्यामुळे त्यामध्ये अतिरेकी असावेत या संशयाला बळ मिळते, असे पर्रीकर म्हणाले.

नौका संशयित अतिरेक्यांची होती का, याचा छडा लावला जाईल. या प्रकरणी पाकिस्तानी सागरी वाहतूक विभाग, लष्कर व आंतरराष्ट्रीय सूत्रांशी संपर्क साधला जात आहे. आपल्या दाव्याला पुरावा काय, या प्रश्नावर पर्रीकर यांनी परिस्थितिजन्य पुराव्यावरून आपण हे बोलत असल्याचे सांगितले. २६/११ च्या मुंबई हल्ल्यासारखा कट उधळून लावल्याच्या वृत्तावर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

नौका मासेमारीच्या क्षेत्रात नव्हती
नौका मासेमारीच्या भागात नव्हती किंवा तस्कर वापरत असलेल्या मार्गावरही नव्हती. त्यांच्या हालचालीत अन्य हेतू असल्याचे उघड होते. मात्र, त्याच वेळी आम्हाला दुसरा निश्चित उद्देशही माहीत नसल्याचे पर्रीकर म्हणाले. उपग्रहाद्वारे प्राप्त संभाषणात मालवाहू नौकेने सीमा ओलांडल्याबद्दल तसेच काही खलाशी कुटुंबीयांशी बोलले.तस्कर जलवाहतूक संस्था, लष्कराच्या संपर्कात राहत नाहीत असा दावा पर्रीकर यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ केला. तस्करी बोटीतील लोक अमली पदार्थ फेकून शरण येतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

तस्कर आत्महत्या करतो ?
नौकेच्या हालचाली या तस्कराच्या बोटीशी अनुकूल नव्हत्या. अखेर कोणता तस्कर आत्महत्या करेल, एवढेच मला यातून म्हणायचे आहे, असे पर्रीकर यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने या प्रकरणात भाजपवर टीका केली आहे. दुसरीकडे काँग्रेसने या प्रकरणावरून पाकिस्तानला ऑक्सिजन देऊ नये, त्यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर राजकारण करू नये, असे भाजपने म्हटले आहे. आपल्याला अशा चर्चांमध्ये पडायचे नाही, परंतु स्फोट झालेल्या नौकेचे ठिकाण मासेमारीच्या संबंधित नव्हते एवढे आपले म्हणणे असल्याचे पर्रीकर म्हणाले.