नवी दिल्ली - कारगिल दिनाच्या निमित्ताने रविवारी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. इंडिया गेटच्या 'अमर जवान ज्योती' या स्मृतीस्थळावर संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि लष्कराच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांनी पाकिस्तानबरोबर झालेल्या कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या स्मृती जागवल्या. यावेळी 'वन रँक वन पन्शन' च्या मागणीसाठी निवृत्त सैनिकांनी इंडिया गेटवर आयोजित मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. या सैनिकांच्या समर्थनार्थ अण्णा हजारे यांचीही उपस्थिती होती.
पंतप्रधानांची श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी ट्विटद्वारे, कारगिल विजय दिवस हा आमच्या सैनिकांचे शौर्य, पराक्रम आणि बलिदानाची आठवण करून देतो. मातृभूमीवर सर्वस्व अर्पण करणाऱ्या शहिदांना शतशः प्रमाण, अशा भावना मांडल्या.
जवांनाना दिलेले आश्वासन पूर्ण करा
याठिकाणी आलेले अण्णा हजारे म्हणाले की, जवानांना अनेक आश्वासने देण्यात आली. पण त्यांची पूर्तता केली नाही. अजूनही दोन महिने शिल्लक आहेत. आम्ही पूर्ण देशात फिरणार आहोत. पाच दिवसांपासून संसदेचे कामकाज होत नसल्याचे आम्ही पाहत आहोत. संसदेचा एका दिवसाचा खर्च किती आहे? हे पैसे कुणाचे आहेत? आमचे आहेत. जंतर मंतरवर निवृत्त अधिकाऱ्यांच्या धरणे आंदोलनातही अण्णा सहभागी होणार आहेत. अण्णा हजारेंनी यापूर्वीच वन रँक वन पेन्शन आणि भू संपादन विधेयक या मुद्यावरून 2 ऑक्टोबरपासून उपोषणाला बसणार आहेत. यासंदर्भात अण्णांनी पंतप्रधानांना पत्रही लिहिले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने इंडिया गेटवर जमलेल्या सैनिकांचे आणि श्रद्धांजली देण्यासाठी आलेले संरक्षण मंत्री आणि लष्करी अधिका-यांचे PHOTOS