आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहशतवाद्यांचा बीमोड, हल्लेखोरांना जशास तसे उत्तर देणार : संरक्षण मंत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दहशतवाद्यांचा दहशतवाद्यांकडूनच बीमोड केला जाईल,असे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भारताच्या रक्षणासाठी कोणत्याही हद्दीपर्यंत जाण्याची तयारी असल्याचे सांगत हल्लेखोरांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असे म्हटले आहे.
अापल्या वक्तव्यावर पाकिस्तानचे नाव न घेता केवळ एकाच देशाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे सांगत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण तळांबाबत प्रश्न होता, त्यामुळे प्रतिक्रिया त्या अनुषंगाने होती, असे पर्रीकर म्हणाले. दहशतवाद्यांची शक्ती कमी करण्याचा अर्थ ठार करणे असा होत नाही. दहशतवाद्यांनी मुख्य प्रवाहात येऊन शरणागती पत्करणे असाही होतो. आपले वक्तव्य कोणा एकाविरुद्ध नाही. विधानातील काही भागाला प्रसिद्धी देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मुळात मला माझ्या देशाचे रक्षण करायचे असेल तर मी कोणत्याही स्थितीपर्यंत जाऊ शकतो. त्यासाठी जे काही करता येईल ते केले जाईल. कोणी देशाला नुकसान पोहोचवत असेल तर त्याच्यावर हल्ला करणे हे लष्कराचे मूळ धोरण असते. कोणी १३ लाखांचे सशक्त लष्कर केवळ शांततेचा उपदेश देण्यासाठी ठेवत नाही. याचा अर्थ मी एखाद्या कारवाईच्या तयारीत आहे, असा काढू नये, असे पर्रीकर म्हणाले.