आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Defence Minister Says Army Is Ready To Reply Any Ceasefire Violation

जेटलींची पाकला चेतावणी : शस्त्रसंधी उल्लंघनास चोख प्रत्युत्तर देण्यास सैन्य सज्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : संरक्षण मंत्री अरुण जेटली 18 ऑगस्टला लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंह सुहाग (उजवीकडे) यांच्याबरोबर अमृतसरला पोहोचले होते.

नवी दिल्‍ली - सीमेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. त्यावर संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला चेतावणी दिली आहे. भारतीय सैन्य अशा प्रकारांशी दोन हात करण्यास सज्ज असल्याचे जेटली यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांना पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी फुटीरतावाद्यांशी केलेल्या चर्चेवरही टीका केली आहे. पाकिस्तानला भारताबरोबर कसे संबंध हवे आहेत, याचा निर्णय पाकिस्तानलाच घ्यायचा आहे, असे जेटली म्हणाले.
सैन्य देणार प्रत्युत्तर
जेटली यांनी सोमवारी अमृतसरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवरील भारतीय चौक्यांचा दौरा केल्यानंतर फेसबूक आणि ट्वीटरवर प्रतिक्रिया दिली. कसोवाल बीएन एनक्लेव्हचा दौरा करून वीर जवानांबरोबर चर्चा केली. आमचे जवान पाकिस्तानकडून होणा-या शस्त्रसंधीच्या प्रकारांचा निपटारा करण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी पोस्ट केले. आमचे सैन्य कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी नेहमी तयार असल्याचेही जेटली म्हणाले.

शस्त्रसंधी उल्लंघनाचे प्रकार वाढले
काही दिवसांपूर्वीच आंतरराष्‍ट्रीय सीमेवर अरनिया आणि आरएस पुरा सेक्‍टरमध्ये पाकिस्तानकडून किमान 20 भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला आहे. त्यातच संरक्षण मंत्र्यांनी हा दौरा केला. यावेळी जेटली म्हणाले की, आधी केवळ नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन होत होते, पण आता आंतरराष्ट्रीय सीमेवरही हा प्रकार सुरू आहे.

फुटीरतावाद्यांशी चर्चेने भडकले
अमृतसरमध्ये जेटलींना पत्रकारांनी पाकिस्तानी उच्चायुक्त आणि फुटीरतावद्यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारला त्यावर जेटलींनी संतप्त प्रतिक्रिया दिली. शस्त्रसंधी उल्लंघन आणि इतर कृत्यांपाठोपाठ आता फुटीरतावाद्यांना चर्चेसाठी बोलावणे हे अत्यंत गंभीर प्रकरण असल्याचे जेटली म्हणाले. आता पाकिस्तानला भारताबरोबर कसे संबंध प्रस्थापित करायचे आहेत, याचा निर्णय पाकिस्ताननेच घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.