आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संरक्षण मंत्रालयाने मागितले अजुन 20 हजार कोटी रुपये, सरकार करत आहे विचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संरक्षण मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाकडे अतिरिक्त 20 हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. (सांकेतिक फोटो) - Divya Marathi
संरक्षण मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाकडे अतिरिक्त 20 हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. (सांकेतिक फोटो)
नवी दिल्ली- संरक्षण मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाकडे अतिरिक्त 20 हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. अधिक हत्यारे खरेदी करण्यासाठी ही रक्कम हवी असल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. सरकारने मागील महिन्यातच लष्कराला कुठल्याही छोट्या युध्दासाठी हत्यारे खरेदी करण्याची परवानगी दिली होती. त्यामुळेच ही मागणी करण्यात आली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
 
सध्या किती आहे संरक्षण मंत्रालयाचे बजेट
- केंद्र सरकारने यावर्षी संरक्षण मंत्रालयासाठी 2.17 लाख कोटी रुपये मंजुर केले होते. आता संरक्षण मंत्रालयाने 20 हजार कोटी रुपये मागितले आहेत ते मंजुर करण्यात आलेल्या रकमेव्यतिरिक्त आहेत.
- या अतिरिक्त रकमेचा आणि चीनबरोबर असणाऱ्या तणावाचा कोणताही संबंध नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
 
अर्थ मंत्रालयाकडून होतोय विचार
- अर्थ मंत्रालय संरक्षण विभागाच्या या मागणीचा विचार करत आहे. त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.
- अरुण जेटली हे अर्थ मंत्रालयाबरोबरच संरक्षण विभागाचाही अतिरिक्त कार्य़भार सांभाळत असल्याने याबाबत लवकरच निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
- उपलष्करप्रमुखांना आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले असून ते हत्यारे आणि 10 प्रकारच्या हत्यार प्रणालींसाठी स्पेअर पार्ट खरेदी करु शकतात.
 
भारतीय सैन्याला करावा लागतोय दुहेरी सामना
- भारतीय सैन्याला सध्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून घुसखोरीच्या प्रयत्नांचा आणि गोळीबाराचा नियमित सामना करावा लागतोय. 
- दुसरीकडे मागील एक महिन्यापासून डोकलाममध्ये भारतीय आणि चीनचे समोर-समोर आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...