आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान-चीनकडून हेरगिरीची अधिक शक्यता, संरक्षण मंत्रालयाचे रेड अलर्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चीन आणि पाकिस्तान सारख्या देशांच्या गुप्तहेर संस्थांकडून भारताच्या संरक्षणविषयक उपक्रमांना धोका होण्याची शक्यता लक्षात घेऊन संरक्षण मंत्रालयाने सावधानतेचा इशारा दिला आहे. एखादी व्यक्ती किंवा इंटरनेटच्या वापर करुन संरक्षणविषयक माहिती लीक होण्याची शक्यता पाहाता मंत्रालयाने रेड अलर्ट जारी केला आहे.

गृहमंत्रालय आणि इतर गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर संरक्षण मंत्रालयाने तिन्ही दलांना आणि इतर संस्थांना सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. कोणतीही माहिती उघड होणार नाही, याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.
12 मार्च रोजी संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या सुचनांनुसार संरक्षण विषयाशी संबंधीत कर्मचारी, विशेषतः कनिष्ठ कर्मचारी, ज्यांच्याकडे सैन्यासंबंधी माहिती असते असे लोक विदेशी गुप्तचारांचे टार्गेट असतात. फोटोकॉपी मशीन, आऊटसोर्स केलेले कर्मचारी यांचे पोलिस व्हेरिफीकेशन आणि गुप्त माहितींची देवाण-घेवाण होते असे विभाग यांच्यावर विशेष नजर ठेवली जात आहे. तसेच कॉलर आयडी सारख्या हेरगिरीवरही मंत्रालय नजर ठेवून आहे.