आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमधील अतिरेक्यांचे पलायन, सैन्याच्या कारवाईचे दडपण; अरुण जेटली यांचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- काश्मीर खोऱ्यात दडून बसलेले दहशतवादी आता मात्र पलायन करू लागले आहेत. दडून बसलेल्यांवरही सैन्याच्या कारवाईचे दडपण आहे. अतिरेकी दशकानुदशके लोकांमध्ये दहशत पसरवू शकत नाहीत.काश्मीर खोऱ्याला दहशतवाद्यापासून मुक्त करण्यास सरकारचे प्राधान्य आहे, असे संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे.  
 
काश्मीरमधील दहशतवादी सध्या मोठ्या दडपणाखाली आहेत. नोटाबंदीमुळे त्यांना आर्थिक चणचण भासू लागली आहे. एनआयएने परदेशातून येणाऱ्या बेकायदा निधीवरही निगराणी ठेवण्याचे काम व्यापक पातळीवर सुरू आहे, असे जेटली यांनी सांगितले. एका टीव्ही वाहिनीवरील कार्यक्रमात जेटलींनी सरकारची संरक्षणविषयक भूमिका  मांडली.

केंद्रिय संरक्षणमंत्री जेटली म्हणाले..
पाकिस्तानची भूमिका संघर्षाची: काश्मीरबद्दल पाकिस्तानची भूमिका स्वातंत्र्यापासूनच संघर्षाची राहिली आहे. त्याचाच परिपाक म्हणून १९६५, १९७१ आणि कारगिलची युद्धे लादण्यात आली होती. परंतु नव्वदच्या दशकात पाकिस्तानने भारतातील दहशतवादाची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याची नवीन रणनीती खेळली होती.

दगडफेकीच्या घटना इतिहासजमा : अगोदर दहशतवाद्यांवर सैन्य कारवाई केली जात असताना सैन्यावर दगडफेक केली जात होती. शेकडो-हजारोंच्या संख्येने लोक दगडफेक करत. परंतु आता दगडफेक करणाऱ्यांची संख्या २०, ३० वर आली आहे. इतिहासात पहिल्यांदाच दहशतवाद्यांनी राज्यात बँका लुटण्याचे काम केले. त्यावरून दहशतवादी प्रचंड दबावाखाली आल्याचे स्पष्ट होते. ते पलायन करू लागले आहेत. त्यांची संख्याही घटू लागली आहे.

उदात्तीकरण चिंताजनक : देशात दहशतवादी किंवा नक्षलींचे उदात्तीकरण केले जाते. ही चिंतेची बाब आहे. जेएनयूमध्ये गेल्या वर्षी देशविरोधी घोषणाबाजी झाली होती. त्याविषयी मुख्य प्रवाहातून समर्थनाचे सूर उमटले होते. या गोष्टी अस्वस्थ करणाऱ्या आहेत.

पुढील स्‍लाइडवर...चकमकीत हिजबुलच्या कमांडरसह ३ ठार  
बातम्या आणखी आहेत...