आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्यांनी यातना दिल्या, त्यांनाही यातना देणार, संरक्षणमंत्र्यांचे पठाणकोट हल्ल्यावर वक्तव्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पठाणकोट हवाई तळावरील अतिरेकी हल्ल्याबाबत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले की, ज्यांनी आम्हाला यातना दिल्या आहेत, त्यांनाही यातना भोगाव्या लागतील; त्याची जागा अणि वेळ आम्हीच ठरवू. जोवर शत्रूला आमच्याइतक्याच यातना दिल्या जाणार नाहीत तोवर तो आमच्या देशाला असाच त्रास देत राहील.
एका चर्चासत्रात संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी सांगितले की, हे आपले वैयक्तिक मत आहे. ते सरकारचे असल्याचे समजले जाऊ नये. माझी पूर्वीपासून अशी धारणा आहे की, कुणी आपल्या देशाचे नुकसान करत असेल तर ती व्यक्ती वा संघटनेलाही त्याच्या यातना भोगाव्या लागतील. आपल्या जवानांनी दुश्मनांचा असा खात्मा करावा की आपले कमीत कमी नुकसान होईल. आपले ध्येय बलिदान करण्याचे नव्हे तर शत्रूचा खात्मा करण्याचे असावे.

पाकमध्ये अटकसत्र
पठाणकोट हल्ल्यातील संशयितांना पाकिस्तानात अटक झाली जैश-ए-मोहंमदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरचे मूळ गाव असलेल्या भावलपूर जिल्ह्यातून या संशयितांना अटक झाली. भारताने दिलेल्या पुराव्यांवर चौकशीसाठी उच्चस्तरीय संयुक्त तपास पथक स्थापण्याचे शरीफ यांनी आदेश दिले.
बातम्या आणखी आहेत...